‘मोदींनी मनात आणलं तर पाकिस्तानला नकाशावरून हटवू शकतात’; एकनाथ शिंदेंचा संताप

पाकिस्तानने मोदींचा फोटो क्रॉप केल्यावर एकनाथ शिंदेंनी संताप व्यक्त करत पाकिस्तानला थेट इशारा दिला.

Published On: 

Eknath Shinde on Pakistan

किर्गिझस्तानची राजधानी बिश्केक येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेनंतर, एका ‘क्रॉप’ केलेल्या छायाचित्रावरून चर्चा सुरू झाली आहे. या परिषदेला उपस्थित राहिलेल्या जागतिक नेत्यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना, पाकिस्तानच्या (Pakistan) पंतप्रधान कार्यालयाने त्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो क्रॉप केला.

या प्रकारावर भारतात प्रतिक्रिया उमटल्या असून, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी याबद्दल संताप व्यक्त केला आहे. “पाकिस्तानने पंतप्रधान मोदींचा फोटो कापून आपली पातळी दाखवून दिली आहे. पण पंतप्रधान मोदी यांनी मनात आणले तर ते पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून हटवू शकतात.”अशी संतप्त प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Eknath Shinde on Pakistan

बिश्केक येथे आयोजित ‘शांघाय सहकार्य संघटने’च्या (SCO) शिखर परिषदेत सहभागी झालेल्या सर्व देशांच्या प्रमुखांचा सामूहिक फोटो काढण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाने हा सामूहिक फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केला.

मात्र, पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने या फोटोची ‘क्रॉप’ केलेली आवृत्ती सोशल मीडियावर पोस्ट केली, ज्यामध्ये पंतप्रधान मोदी आणि इतर काही देशांच्या प्रमुखांना वगळण्यात आले होते. या कृतीमुळे पाकिस्तानवर आता टीका होत आहे.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

ANI वृत्तसंस्थेशी बोलताना एकनाथ शिंदे यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला असून त्यांनी संताप व्यक्त केला. “पाकिस्तानचे कृत्य दुर्दैवी आहे. पाकिस्तानकडून अशाप्रकारची कृत्ये अनेकदा झाली आहेत. त्यांनी फक्त फोटो हटवला. पण पंतप्रधान मोदींनी मनात आणले तर ते जगाच्या नकाशावरून पाकिस्तानला हटवू शकतात.” अशी संतप्त प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली.

पुढे शिंदे म्हणाले की, “पहलगाममध्ये पाकिस्तनने भ्याड हल्ला केला होता. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात आमच्या सैन्यदलाने ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले. ११ हवाई तळ उडवले.”

“पाकिस्तानला हात टेकण्यास पंतप्रधान मोदी आणि भारतीय सैन्याने भाग पाडले. यामुळे पाकिस्तानने आमच्याशी आगळीक करण्याचा कधीही प्रयत्न करू नये. फोटो हटविण्यासारखे हीन कृत्य केले, तरी देशातील १४० कोटी जनतेच्या मनातून ते पंतप्रधान मोदींना काढू शकत नाहीत.” असे शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, “पंतप्रधान मोदी लोकप्रियतेमध्ये प्रथम क्रमाकांवर आहेत. नुकतेच त्यांना उझबेकिस्तानने त्यांच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले. एकूण ३६ देशांनी त्यांचा सर्वोच्च पुरस्कार पंतप्रधान मोदींना देऊन गौरव केला आहे. पाकिस्तानने फोटो क्रॉप करण्याचे कृत्य करून स्वतःवर नामुष्की ओढवून घेतली आहे.”

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही