कृष्णराज महाडिक म्हणाले, मनसेचे गुंड अंगावर धावून आले; संजय राऊत म्हणाले, बाळा तू…

पुणे फोटो वादावरून मुंबईत मनसे आणिभाजप कार्यकर्ते आमने-सामने आले. कृष्णराज मडाडिकांनी मनसेवर गंभीर आरोप केला असून संजय राऊतांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Published On: 

Sanjay Raut challenges PM Modi tea seller claim

Sanjay Raut: मनसे नेते अमित ठाकरे यांनी पुण्यातील एका महाविद्यालयातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवल्याने भाजप आक्रमक झाली होती. मोदींचा फोटो हटवल्याच्या निषेधार्थ भाजयुमोने राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानाबाहेर आंदोलनाची हाक दिली होती. पण त्याआधीच मनसे आक्रमक झाली.

मुंबईत मनसे-भाजप राडा; कृष्णराज महाडिकांचे गंभीर आरोप

भाजपचे युवा नेते कृष्णराज महाडिक आणि त्यांचे कार्यकर्ते आंदोलनासाठी निघाले होते. मात्र, त्याआधीच मनसैनिकांनी संपूर्ण परिसर ताब्यात घेतला. भाजपच्या कार्यकर्त्यांना शिवाजी पार्कची वेसही ओलांडता आली नाही. या वादानंतर दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आमने-सामने आले आणि एकच गोंधळ उडाला.

या संपूर्ण प्रकारानंतर कृष्णराज महाडिक यांनी माध्यमांशी बोलताना संताप व्यक्त केला. आम्ही अत्यंत शांतपणे आंदोलन करत होतो, असं महाडिक म्हणाले. पण त्याचवेळी मनसेचे गुंड अत्यंत आक्रमक झाले. ते थेट आमच्या अंगावर धावून आले. आमच्यावर मारहाण करण्याचा प्रयत्न केला गेला, असा गंभीर आरोप त्यांनी केला. एवढंच नाहीतर माझ्यावरसुद्धा काही मुले चाल करून आली होती. या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या सर्व घडामोडींवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली. त्यांनी थेट कृष्णराज महाडिक यांना लक्ष्य करत एक खोचक टोमणा मारला. बाळा, तू चुकीच्या पक्षात गेलास, असं म्हणत त्यांनी मुंबईत ठाकरेंचं वर्चस्व असल्याचे म्हटले. ही मुंबई आहे, ती आजही शिवसेना, अस्सल मराठी माणूस आणि ठाकरेंचीच आहे, असे सांगत त्यांनी भाजपला डिवचले आहे. या राजकीय संघर्षामुळे आता आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आणखी मोठी जुगलबंदी रंगण्याची शक्यता दाट आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही