Share

भारतीयांना दुबईतील मुस्लिम आवडतात, मग पाकिस्तानी मुस्लिमांपासून लांब का राहतात? मिका सिंहचा सवाल

‘भारतीयांना दुबईतील मुस्लिम आवडतात, मग पाकिस्तानी मुस्लिमांबद्दल वाईट विचार का केला जातो?’ असा सवाल गायक मिका सिंह यांनी नुकताच एका पॉडकास्टमध्ये उपस्थित केला.

Published On: 

Mika Singh talking about Pakistan and Dubai Muslims

प्रतिनिधी, 11 ऑक्टोबर: बॉलिवूड आणि पंजाबी गायक मिका सिंह यांनी भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांवर भाष्य करताना एक मोठा सवाल उपस्थित केला आहे. भारतीयांना दुबईतील (यूएई) मुस्लिम चांगले वाटतात, मग पाकिस्तानी मुस्लिमांबद्दल वाईट विचार का केला जातो, असा प्रश्न त्यांनी (Mika Singh) विचारला आहे. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे मिका सिंह त्यांच्या या नव्या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

यापूर्वी पाकिस्तानात जाऊन कार्यक्रम केल्यामुळे मिका सिंह यांना मोठ्या वादाला सामोरे जावे लागले होते आणि त्या काळात त्यांच्यावर भारतात बंदीही घालण्यात आली होती.

पाकिस्तानी कलाकार आणि तिथल्या सामान्य नागरिकांबद्दलचे आपले वैयक्तिक अनुभव मांडताना मिका सिंह म्हणाले की, तिथले लोक वाईट नाहीत. “पाकिस्तान वाईट नाही. पाकिस्तानचे लोक कुठेही वाईट नाहीत. आपल्याला पाकिस्तानचेच मुस्लिम वाईट वाटतात, हे का मला कळत नाही. पण दुबईचे मुस्लिम खूप चांगले वाटतात. ही गोष्ट मला आजपर्यंत समजलेली नाही,” असे मिका यांनी स्पष्ट केले.

दोन्ही देशांतील सांस्कृतिक संबंधांवर बोलताना मिका सिंह यांनी पाकिस्तानातील शीख धर्मस्थळांचाही आवर्जून उल्लेख केला. पाकिस्तानात ननकाना साहिब आणि पंजा साहिब यांसारखी अत्यंत पवित्र गुरुद्वारे आहेत. या गुरुद्वारांमध्ये अनेक स्थानिक मुस्लिम बांधव स्वतःहून सेवा देतात आणि स्वच्छतेच्या कामात मदत करतात, हे आपण स्वतः पाहिले असल्याचे त्यांनी सांगितले.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही