Share

‘सैराट’ फेम अरबाज शेखच्या मदतीला एकनाथ शिंदे धावले; वडिलांच्या उपचारासाठी सोलापुरात नेमकं काय घडलं?

अरबाज शेखच्या वडिलांच्या उपचारातील लुटीची एकनाथ शिंदेंनी दखल घेतली असून, नोबेल हॉस्पिटलवर कारवाई करण्यात आली आहे. आता नव्या हॉस्पिटलने उपचाराची जबाबदारी घेतली आहे.

Published On: 

Arbaaz Sheikh Father Eknath Shinde helps Sairat actor for medical treatment in Solapur

रुग्णालयांच्या मनमानी कारभाराचा फटका फक्त सर्वसामान्यांनाच बसतो असं नाही, तर सेलिब्रिटींनाही याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. ‘सैराट’ फेम अभिनेता अरबाज शेख (Arbaaz Sheikh) याने नुकताच आपल्या वडिलांच्या उपचाराबाबत रुग्णालयाबाहेर उभा राहून एक रडता व्हिडीओ शेअर केला होता.

या व्हिडीओनंतर आता राज्याच्या यंत्रणा कशा वेगाने हलल्या आहेत? अरबाजच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज आणि हृदयविकाराचा त्रास असल्याने सोलापूरच्या नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

Arbaaz Sheikh Father Eknath Shinde

मात्र, तिथे औषध खरेदीसाठी सक्ती आणि मोठी आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर आरोप त्याने केला होता. अरबाजच्या व्हिडीओनंतर अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) तातडीने पावलं उचलली.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एफडीएचे सहाय्यक आयुक्त अरुण गोडसे यांनी नोबेल हॉस्पिटलच्या मेडिकलची झाडाझडती घेतली. यात गंभीर त्रुटी आढळल्याने तातडीने औषध विक्री बंद करण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत.

दुसरीकडे, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सूचनेनुसार शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी थेट सोलापुरात जाऊन अरबाजची भेट घेतली. चिवटे यांच्या मध्यस्थीनंतर आता सोलापुरातील प्रसिद्ध डॉ. वळसंगकर हॉस्पिटलने (एस. पी. न्युरोसायन्स) उपचाराची मोठी जबाबदारी घेतली आहे.

डॉ. अश्विन वळसंगकर यांनी अरबाजच्या वडिलांवर उपचारासाठी पूर्ण मदत करण्याचं मान्य केलं आहे. आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी अरबाजने सोशल मीडियावर हतबल होऊन मदत मागितली होती.

१० हजार डिपॉझिट आणि केवळ त्यांच्याच मेडिकलमधून ४० हजारांची औषधं घेण्याची सक्ती, हा त्याचा अनुभव अंगावर काटा आणणारा होता. मात्र, आता योग्य ती वैद्यकीय मदत मिळाल्याने शेख कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही