सतत गगनाला भिडणाऱ्या सोन्याच्या दरामुळे सर्वसामान्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली होती. पण आता अखेर सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आलीय! गेले काही दिवस सातत्याने वाढणाऱ्या सोन्याच्या भावाला आता अचानक ब्रेक लागलाय.
आज, शनिवारी (२३ मे) सकाळीच आलेल्या या Gold Price Today अपडेटने ग्राहकांना सुखद धक्का दिलाय. मिडल ईस्टमधील वाढता तणाव आणि जागतिक बाजारातील घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
Gold Price Today
राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर १,५९,६३० रुपये प्रति १० ग्रॅमवर आलाय. तर, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत हाच दर १,५९,४८० रुपये नोंदवला गेलाय. चेन्नई आणि कोलकातामध्येही दरात चढ-उतार पाहायला मिळत असून चेन्नईत हा दर १,६१,२३० रुपयांवर पोहोचलाय.
विशेष म्हणजे, फक्त सोनंच नाही तर चांदीच्या दरातही मोठी घट झाली आहे. आज सकाळी चांदीचा भाव २,८४,९०० रुपये प्रति किलोवर आलाय. याच चांदीने जानेवारी महिन्यात तब्बल ४ लाखांचा टप्पा पार करून सर्वांची झोप उडवली होती!
बाजार तज्ज्ञांच्या मते, सध्या अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य चर्चेकडे संपूर्ण जगाचे आणि गुंतवणूकदारांचे लक्ष लागून आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतील अस्थिरता, जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती आणि डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण याचा थेट परिणाम या दरांवर झालाय.
आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड ४,५२२.३२ डॉलर प्रति औंस या स्तरावर व्यवहार करत आहे. लग्नसराईचा काळ आणि त्यातच ही दरवाढ थांबल्याने आता बाजारात ग्राहकांची पावलं पुन्हा दागिन्यांच्या दुकानाकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- कान्समध्ये आराध्याने ऐश्वर्याला टाकलं मागे; ‘त्या’ एका लुकने इंटरनेटवर उडवली खळबळ!
- ‘लाडकी बहीण योजना बंद करा, पण…’; गुणरत्न सदावर्तेंचा सरकारला घरचा आहेर, जरांगे-लाड भेटीवरही कडाडून टीका
- पेट्रोल-डिझेलचा सर्वसामान्यांना तिसरा झटका; आठवडाभरातच कडाडले भाव, तुमच्या शहरात काय आहेत नवे दर?
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









