🕒 1 min read
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधनाचा वापर जपून करण्याचं आवाहन केलं, तेव्हाच अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. भविष्यात येणाऱ्या महागाईच्या संकटाची जी भीती होती, ती आता दुर्दैवाने खरी ठरताना दिसत आहे.
कारण अवघ्या नऊ दिवसांत पेट्रोलियम कंपन्यांनी सर्वसामान्यांना तब्बल तिसऱ्यांदा महागाईचा मोठा झटका दिलाय. शनिवार सकाळपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत.
Petrol Diesel Price Hike
आंतरराष्ट्रीय बाजारात इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धामुळे खनिज तेलाचे दर गगनाला भिडलेत. पाच राज्यांच्या निवडणुका संपताच तेल कंपन्यांनी आपला तोटा भरून काढण्यासाठी इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे.
ताज्या दरवाढीनुसार, पेट्रोलच्या दरात प्रतिलीटर ८७ पैसे तर डिझेलच्या दरात ९१ पैशांची मोठी वाढ करण्यात आली आहे. या नव्या वाढीमुळे मुंबईत आता पेट्रोल १०८.४५ रुपये आणि डिझेल ९५.०२ रुपयांवर पोहोचलं आहे. तर दिल्लीत सीएनजीचा दर प्रति किलो ८१.०९ रुपये झालाय.
या पेट्रोल डिझेल प्राईस हाईक (Petrol Diesel price hike) मुळे महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये तर पेट्रोलने ११० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. परभणीत पेट्रोल सर्वाधिक म्हणजे ११०.४५ रुपये प्रतिलीटरवर गेलं आहे.
एकीकडे खिसा रिकामा होत असताना दुसरीकडे राज्यातील बुलढाणा, जळगाव आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचा तुटवडा जाणवू लागल्याने पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हीच परिस्थिती राहिली, तर येत्या काळात सर्वसामान्यांचे कंबरडे आणखी मोडणार हे स्पष्ट आहे.
राज्यातील प्रमुख शहरांमधील नवे दर:
पुणे: पेट्रोल – १०८.७६, डिझेल – ९४.४०
नाशिक: पेट्रोल – १०९.७१, डिझेल – ९६.२६
नागपूर: पेट्रोल – १०८.९७, डिझेल – ९५.५८
रत्नागिरी: पेट्रोल – ११०.४४, डिझेल – ९७.०१
📌 महत्वाच्या बातम्या
- “मिका सिंगच्या पार्टीत मला जबरदस्ती किस केलं होतं आणि……”; राखी सावंतचा मोठा खुलासा!
- शिखर धवन लग्नाच्या अवघ्या ३ महिन्यांतच दुसऱ्यांदा हनिमूनला, पत्नी सोफीसोबत थेट… पाहा PHOTOS
- मॅनफोर्सला युद्धाचा फटका; पेट्रोल-डिझेल नाही, तर आता चक्क कंडोमही होणार महाग!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












