🕒 1 min read
पेट्रोल पंपावर जाऊन गाडीची ‘फुल टँक’ करण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, कारण येत्या काही दिवसांतच तुमच्या खिशाला मोठी कात्री लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे भाव अक्षरशः गगनाला भिडले आहेत. या जागतिक घडामोडींचा थेट फटका आता भारतातील सर्वसामान्य वाहनचालकांना बसणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय.
Petrol Diesel Price Hike
मध्यपूर्वेतील हे युद्धाचे ढग असेच दाटून राहिले, तर भारतात इंधन दरवाढ (Petrol Diesel Price Hike) अटळ आहे, असे अत्यंत स्पष्ट संकेत आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले आहेत.
स्वित्झर्लंडमध्ये स्विस नॅशनल बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आयोजित केलेल्या एका विशेष परिषदेत बोलताना मल्होत्रा यांनी ही आर्थिक भीती व्यक्त केली. “युद्धस्थिती अशीच दीर्घकाळ सुरू राहिली, तर नाइलाजाने वाढलेल्या दरांचा थेट भार ग्राहकांवरच टाकावा लागेल,” असा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केलाय. सरकारी तेल कंपन्या सध्या वाढीव दरांचा सामना करत असून, हे संकट लवकर न संपल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.
दुसरीकडे, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या एका सूचक वक्तव्याने या चर्चेत आणखी भर पडली आहे. देशात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे हे त्यांनी स्पष्ट केलंय. पण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर प्रति बॅरलच्या पार गेले असतानाही देशांतर्गत दर न वाढवल्याने, सरकारी तेल कंपन्यांना दररोज तब्बल १००० कोटी रुपयांचा प्रचंड फटका बसतोय. हा आर्थिक तोटा असाच सुरू राहिल्यास दर वाढवण्याशिवाय सरकारकडे दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही.
आता सर्वांचे लक्ष येत्या ५ जूनला होणाऱ्या आरबीआयच्या महत्त्वपूर्ण बैठकीकडे लागून आहे. गेल्या एप्रिल २०२६ मध्ये आरबीआयने रेपो रेट ५.२५ टक्क्यांवर स्थिर ठेवून दिलासा दिला होता. पण वाढत्या इंधन दरांमुळे महागाईवर नियंत्रण मिळवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. थोडक्यात सांगायचं तर, आंतरराष्ट्रीय राजकारण तापलं असून, त्याचे चटके आता थेट आपल्या घरगुती बजेटला बसणार आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- राकेश-तेजश्रीच्या लग्नाची चर्चा, बहिणीने अखेर सत्य सांगितलंच; आईलाही बसला होता मोठा धक्का!
- पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या काय आहेत नवे दर?
- मुख्यमंत्री थलपती विजय यांचा धडाकेबाज निर्णय; एका झटक्यात ७१७ दारूची दुकाने बंद, कमल हसन यांची पोस्ट व्हायरल, म्हणाले….
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












