🕒 1 min read
कधी नव्हे ते सोन्याच्या दरांनी अशी उसळी घेतलीये की, आता सामान्य माणसाच्या तोंडचं पाणी पळालंय. आखाती देशांतील युद्धाचे पडसाद आता थेट तुमच्या-आमच्या खिशावर उमटताना दिसत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशवासीयांना पुढील वर्षभर सोनं खरेदी (Gold Silver Rate) न करण्याचं आणि इंधनाचा वापर कमी करण्याचं अत्यंत महत्त्वाचं आवाहन केलं. या आवाहनापाठोपाठच केंद्र सरकारने अत्यंत मोठा निर्णय घेत, सोने-चांदीवरील आयात शुल्क (Import Duty) थेट ६ टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत वाढवलं आहे. आजपासूनच हा नवा नियम लागू झाल्याने सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे.
Gold Silver Rate Today
या निर्णयाचा फटका लगेचच दिसून आला. आज बाजार उघडताच (Gold-Silver Rate Today) सोन्याच्या दरात तब्बल ११ हजारांची ऐतिहासिक वाढ नोंदवली गेली. कालपर्यंत १ लाख ५१ हजार रुपये असलेलं सोनं आज थेट १ लाख ६२ हजार रुपयांवर पोहोचलंय. तर चांदीनेही ३० हजारांची झेप घेत थेट २ लाख ९८ हजारांचा टप्पा गाठला आहे.
पण अचानक हे पाऊल का उचललं? देशाचा डॉलर साठा वाचवणं हे यामागचं मुख्य कारण आहे. भारत जेव्हा सोनं, तेल किंवा खते आयात करतो, तेव्हा त्याचे पैसे डॉलरमध्ये द्यावे लागतात. डॉलर वाचवण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचं सूत्रांनुसार बोललं जातंय. विशेष म्हणजे, या वाढीव आयात शुल्कातील ५ टक्के वाटा हा कृषी आणि विकासकामांवर खर्च होणार आहे.
देशाची अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी मोदींनी आणखी काही गोष्टींवर भर दिला आहे. सोन्याची खरेदी टाळण्यासोबतच, पेट्रोल-डिझेलचा जपून वापर करा, वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या, स्वदेशी उत्पादनांचा वापर करा आणि परदेश प्रवास टाळा, अशी महत्त्वाची आवाहने त्यांनी केली आहेत. थोडक्यात, जागतिक संकटाच्या काळात भविष्यातील आर्थिक धक्के पचवण्यासाठी भारताची ही सावधगिरीची ढाल आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री थलपती विजय यांचा धडाकेबाज निर्णय; एका झटक्यात ७१७ दारूची दुकाने बंद, कमल हसन यांची पोस्ट व्हायरल, म्हणाले….
- विजयला मुख्यमंत्री होण्यापासून रोखलं? राज्यपालांवर प्रकाश राज भडकले; तमिळनाडूत मोठी राजकीय खळबळ!
- हार्दिक पांड्या अंबानींना सोडणार? ‘चेन्नई’मध्ये एन्ट्रीच्या चर्चांनी आयपीएलमध्ये उडाली मोठी खळबळ!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











