Share

‘दोष व्यवस्थेचा, शिक्षा विद्यार्थ्यांना?’ राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्या 3 मागण्या

महाराष्ट्रातील Maha TET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधी यांनी राज्य सरकारवर टीका करत तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत.

Published On: 

Rahul Gandhi on CM

मुंबई: NEET परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबतच्या प्रकारानंतर, आता ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ (TET) ची प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. या गंभीर प्रकरणावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

“दोष व्यवस्थेचा आहे, मग त्यासाठी प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना शिक्षा का दिली जात आहे?” असा संतप्त सवाल करत राहुल गांधींनी याप्रकरणी मुख्यमंत्र्यांसमोर थेट तीन प्रमुख मागण्या (Three Demands) मांडल्या आहेत.

महाराष्ट्रातील टीईटी (TET) परीक्षेबाबत निर्माण झालेल्या गोंधळामुळे तब्बल ६ लाख उमेदवारांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. परीक्षा रद्द होऊन दोन आठवडे उलटून गेले, नवीन तारखेबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही. या पार्श्वभूमीवर, राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे सरकारवर कडक शब्दांत टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, जे देश आणि राज्याचे भवितव्य घडवणार आहेत, तेच उमेदवार सध्या स्वतःच्या भवितव्याबाबत अनिश्चिततेच्या अंधारात चाचपडत आहेत.

शिक्षक बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या उमेदवारांनी अनेक वर्षे कठोर परिश्रम घेतले, अर्ज केले, अवाढव्य शुल्क भरले आणि परीक्षा देण्यासाठी दूरवरच्या केंद्रांवर प्रवास केला. तरीही, आज त्यांच्या हाती केवळ दीर्घ प्रतीक्षा आणि निराशाच उरली आहे. प्रश्नपत्रिका फुटण्यास जबाबदार असलेले लोक मोकाट फिरत आहेत, भ्रष्ट व्यवस्था स्वतःचा बचाव करत आहे आणि या प्रक्रियेत केवळ प्रामाणिक उमेदवारच भरडले जात आहेत. दरम्यान, या गोंधळावर तात्काळ उपाय शोधण्यासाठी राहुल गांधी यांनी थेट मुख्यमंत्र्यांना उद्देशून तीन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत:

मागण्या काय?

१. महा-TET परीक्षेची नवीन तारीख आजच्या आज जाहीर करण्यात यावी.
२. पेपरफुटीला जे जबाबदार आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करा; प्रामाणिक उमेदवारांना त्रास देऊ नका.
३. या पेपरफुटीमुळे ज्या उमेदवारांचे महत्त्वाचे वर्ष वाया गेले आहे, त्यांना वयोमर्यादेत शिथिलता (सवलत) देण्यात यावी.

17 जुलैला युवा क्रांती’चा एल्गार

“अन्यायाविरुद्ध मी यापुढे गप्प बसणार नाही,” असे जाहीर करत राहुल गांधींनी देशाच्या शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदलांची गरज असल्याचे अधोरेखित केले. देशभरातील परीक्षांचे पेपर फुटण्याची समस्या आणि त्यामुळे तरुणांचे भविष्य धोक्यात येत असल्याची बाब यांवर चर्चा करण्यासाठी त्यांनी १७ जुलै रोजी डेहराडूनमध्ये एका विशेष बैठकीचे आयोजन केले आहे.

“देशात शैक्षणिक क्रांतीची वेळ आली आहे. आपल्याला अशी व्यवस्था निर्माण करावी लागेल जिथे तरुणांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळेल. त्याऐवजी, व्यवस्थेतील त्रुटींमुळे त्यांना शिक्षा भोगावी लागणार नाही”, अशा शब्दांत राहुल गांधींनी आपली भूमिका पुन्हा एकदा मांडली. दरम्यान, महाराष्ट्रातील TET परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे त्रस्त झालेल्या लाखो उमेदवारांकडून सोशल मीडियावर या भूमिकेला प्रचंड पाठिंबा मिळत आहे आणि आता राज्य सरकार यावर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही