Share

iPhone 18 Pro: ९ सप्टेंबरला ॲपलचा मोठा इव्हेंट; बाजारात येणार पहिलावहिला फोल्डेबल आयफोन?

ॲपलच्या बहुचर्चित इव्हेंटमध्ये iPhone 18 Pro सिरीज आणि पहिलावहिला फोल्डेबल फोन ‘Ultra’ लाँच होण्याची शक्यता आहे. ९ सप्टेंबरला हा इव्हेंट पार पडेल.

Published On: 

Apple iPhone 18 Pro launch event details and upcoming foldable ultra features

पुणे– आयफोनप्रेमींचा यंदाचा ‘टेकसप्टेंबर’ खऱ्या अर्थाने गाजणार आहे. कारण, ॲपलने त्यांच्या बहुचर्चित iPhone 18 Pro लाँच इव्हेंटची अधिकृत घोषणा केलीय. विशेष म्हणजे, यावेळी रेग्युलर आयफोन १८ बाबत कोणतीही चर्चा नाही. संपूर्ण फोकस फक्त आणि फक्त प्रीमियम मॉडेल्सवर असणार आहे.

पण, या सगळ्यात खरी उत्सुकता आहे ती, ॲपल आपला पहिला फोल्डेबल फोन याच इव्हेंटमध्ये लाँच करणार असल्याची बाजारात जोरदार चर्चा आहे. या मॉडेलचं नाव ‘Ultra’ असू शकतं. त्यामुळे सॅमसंग आणि गुगलचं नक्कीच टेन्शन वाढणार. हा इव्हेंट बुधवार, ९ सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे. भारतात तो रात्री साडेदहा वाजता युट्यूब आणि ॲपलच्या इव्हेंट पेजवर मोफत लाईव्ह पाहता येईल.

iPhone 18 Pro चे भन्नाट फीचर्स 

यंदा आयफोनमध्ये नेमकं काय नवं असेल?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रो मॉडेलमध्ये ६.३ इंचांचा आणि प्रो मॅक्समध्ये ६.९ इंचांचा रेटिना डिस्प्ले मिळणार आहे. यात १२० हर्ट्झचा प्रोमोशन स्क्रीन असेल. हे फोन्स अतिशय वेगवान ‘A20 Pro’ चिपसेटवर चालतील. ॲपलचे अत्याधुनिक एआय (AI) फीचर्स सहज चालवण्यासाठी यात तब्बल १२ जीबी रॅम दिली जाणार आहे. सोबतच नव्या ‘iOS 27’ प्रणालीचा जलद अनुभवही युजर्सना घेता येईल.

कॅमेराप्रेमींसाठी तर ही मोठी ट्रीट

प्रो मॅक्स मॉडेलमध्ये ‘व्हेरिएबल अपर्चर’ लेन्स मिळण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे काय? तर, सेन्सरपर्यंत किती प्रकाश पोहोचू द्यायचा, यावर तुमचं थेट नियंत्रण राहील. थोडक्यात सांगायचं तर, कोणत्याही लाईटमध्ये एकदम क्लिअर आणि डिटेल फोटो येतील. यात बॅटरी मोठी असेल, त्यामुळे डिझाईन स्लिम नसली तरी पॉवर इफिशियन्सीमुळे दमदार बॅटरी लाईफ नक्कीच मिळेल.

iPhone 18 Pro ची किंमत किती?

ॲपलने किंमतीत मोठी वाढ केल्याचं बोललं जातंय. भारतात iPhone 18 Pro ची सुरुवात साधारण १ लाख ५० हजारांपासून होऊ शकते. तर, प्रो मॅक्स मॉडेलसाठी खिशाला आणखी २० हजारांची कात्री लागू शकते. या जागतिक इव्हेंटची थीम ‘Surprise and Shine’ अशी आहे. पण, चीनमधील इन्व्हाईटमध्ये ‘folds’ हा शब्द वापरल्याने चर्चांना उधाण आलंय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install