मुंबई– तुम्हीही ॲपलचे चाहते आहात? मग तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. आयफोन १८ प्रो (iPhone 18 Pro) आणि प्रो मॅक्स सीरिज लवकरच बाजारात धडकणार आहे. तेही अपेक्षेपेक्षा खूप आधी!
दरवर्षी ॲपल सप्टेंबरमध्ये नवे आयफोन लाँच करतं. पण यंदाची रणनीती थोडी वेगळी आहे. रेग्युलर आयफोन १८ थेट २०२७ मध्ये बाजारात येऊ शकतो. त्यामुळे यंदाच्या लाँचिंगमध्ये फक्त ‘प्रो’ मॉडेल्सचाच जलवा दिसेल. विशेष म्हणजे, ॲपलचा पहिला फोल्डेबल आयफोनही याच इव्हेंटमध्ये लाँच होऊ शकतो, अशी जोरदार चर्चा आहे.
iPhone 18 Pro ची हवा! नवा कॅमेरा आणि दमदार प्रोसेसर
लाँचिंग कधी होणार?
९ सप्टेंबरला हा मेगा इव्हेंट होऊ शकतो, असा अंदाज आहे. अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण जर हे खरं ठरलं, तर हा इव्हेंट ॲपलच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा इव्हेंट असेल.
यात नवीन काय मिळणार?
सर्वात मोठा बदल म्हणजे नवा A20 प्रो चिपसेट. हा प्रोसेसर TSMC च्या 2nm प्रोसेसवर बनवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे फोनचा वेग जबरदस्त वाढेल आणि बॅटरीही जास्त काळ टिकेल. सोबतच, फोनची रॅमही वाढवली जाऊ शकते.
डिझाईन आणि कॅमेऱ्याचं काय?
आयफोनची ओळख असलेलं ‘डायनॅमिक आयलंड’ कायम राहील. पण त्याचा आकार थोडा लहान होईल. मॅकरुमर्सच्या रिपोर्टनुसार, अंडर-डिस्प्ले फेस आयडी या मॉडेलमध्ये येण्याची शक्यता कमीच आहे. मात्र, कॅमेऱ्यात मोठा बदल दिसेल. मेन कॅमेऱ्यात ‘व्हेरिएबल अपर्चर’ मेकॅनिझम असेल. म्हणजेच, प्रकाशाच्या प्रमाणानुसार कॅमेऱ्याची लेन्स स्वतःहून ॲडजस्ट होईल. त्यामुळे कोणत्याही लाईटमध्ये फोटो एकदम क्लिअर येतील.
किंमत किती वाढणार?
महागडे पार्ट्स आणि वाढलेल्या मेमरीमुळे यंदा खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या अंदाजानुसार, भारतात प्रो मॉडेल्सची किंमत ५,००० ते २०,००० रुपयांनी वाढू शकते. साहजिकच, फक्त लहान डायनॅमिक आयलंडसाठी जुने युजर्स एवढे पैसे मोजणार नाहीत. पण नवा 2nm चिपसेट आणि कॅमेऱ्यातील भन्नाट अपग्रेड्स नक्कीच ग्राहकांना भुरळ घालू शकतात.
📌 महत्वाच्या बातम्या
- बिडकीनमध्ये ईद-ए-मिलादुन्नबीचा अभूतपूर्व उत्साह! भव्य जलूसमध्ये तरुणाईचा लक्षणीय सहभाग
- संशयाचं भूत मानगुटीवर! चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा गळा आवळून खून
- नेपाळमध्ये महाप्रलय! 62 जणांचा मृत्यू, 500 हून अधिक बेपत्ता; भारतालाही धोका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











