📰
आमचं App डाउनलोड करा! ⭐⭐⭐⭐⭐
सर्वात आधी ताज्या बातम्या मिळवा — Free!
Download करा
Share

सोने-चांदीचा भडका: एकाच दिवसात दरात मोठी उसळी; ‘हे’ नवे दर पाहून खरेदीदारांना फुटला घाम!

सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. सोने ३१५१ रुपयांनी तर चांदी तब्बल ८४३२ रुपयांनी महागल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे.

Published On: 

Gold Silver Rate Hike: सोन्या-चांदीचा मोठा भडका!

🕒 1 min read

सोनं खरेदीचा विचार करताय? तर खिशाला थोडी जास्त झळ सोसायची तयारी आत्ताच ठेवा. कारण सराफा बाजारात आज पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. सोन्या-चांदीच्या दरात (Gold Rate Today) एकाच दिवसात एवढी मोठी वाढ झालीय, की सामान्य ग्राहकांना अक्षरशः घाम फुटलाय.

गुरुवारी, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सव्वा बारा वाजता ‘इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन’ने (IBJA) सोन्या-चांदीचे नवीन दर जाहीर केले. त्यानुसार, Gold Rate मध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. २४ कॅरेट सोन्याचा भाव तब्बल ३,१५१ रुपयांनी वाढून १,५४,७३५ रुपये (जीएसटीविना) प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. तर ३ टक्के जीएसटीसह हाच दर आता १,५९,३७७ रुपयांवर गेलाय.

Gold Silver Rate Hike

फक्त सोनंच नाही, तर चांदीनेही ग्राहकांच्या खिशाला जोरदार कात्री लावलीय. चांदीच्या दरात एका झटक्यात ८,४३२ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे एक किलो चांदीसाठी आता (जीएसटीविना) २,४५,२३० रुपये मोजावे लागतील. विशेष म्हणजे, जीएसटीसह चांदीचा दर आता अडीच लाखांच्या पार गेला आहे.

याशिवाय, २२ कॅरेट सोन्याचा दरही २,८८६ रुपयांनी वाढून १,४१,७३७ रुपये (जीएसटीविना) झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र थोडं वेगळं चित्र पाहायला मिळतंय. तिथे स्पॉट सिल्व्हर ०.५ टक्क्यांनी घसरून ७६.८३ डॉलर प्रति औंसवर आलंय आणि गुंतवणूकदारांचे लक्ष आगामी आर्थिक आकडेवारीकडे लागले आहे.

दरात एवढी वाढ झाली असली, तरी ग्राहकांसाठी एकच दिलासादायक गोष्ट आहे. ती म्हणजे, सोने अजूनही त्याच्या सर्वोच्च पातळीवरून (१,७६,१२१ रुपये) जवळपास २१,३८६ रुपयांनी स्वस्त आहे. पण आगामी काळात हे दर आणखी भडकणार की दिलासा मिळणार? याकडे आता सर्वांचे डोळे लागले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!