Share

हार्दिक पांड्याचं दुसरं प्रेम: मध्यरात्री शेअर केला ‘तो’ बोल्ड फोटो; विश्वचषकातच उडाली मोठी खळबळ!

टी-२० विश्वचषकाचा थरार सुरू असतानाच हार्दिक पांड्याने गर्लफ्रेंड माहिकासोबतचा स्विमिंग पूलमधील बोल्ड फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची अधिकृत कबुली दिली आहे.

Published On: 

Hardik Pandya celebrating with Indian tricolor flag after T20 World Cup final at Ahmedabad

क्रिकेटच्या मैदानात भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणारा खेळाडू जेव्हा प्रेमाच्या पिचवर ‘क्लीन बोल्ड’ होतो, तेव्हा चर्चा तर होणारच ना? टी-२० विश्वचषकाचा थरार शिगेला पोहोचला असतानाच आता टीम इंडियाच्या एका स्टार अष्टपैलू खेळाडूने असा काही फोटो शेअर केलाय की सोशल मीडियावर नुसता राडा झालाय.

सध्या श्रीलंका दौऱ्यावर असलेला हार्दिक पांड्या (Hardik Pandya) त्याच्या धडाकेबाज खेळासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये आलाय. २०२४ मध्ये नताशा स्टेनकोविकसोबतच्या घटस्फोटानंतर हार्दिकच्या आयुष्यात कुणीतरी खास आल्याची चर्चा होतीच.

Hardik Pandya Mahieka Sharma

पण आता यावर स्वतः हार्दिकनेच मोहोर उमटवलीय. निमित्त होतं त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा (Mahieka Sharma) हिचा वाढदिवस. हार्दिकने चक्क मध्यरात्री इंस्टाग्राम स्टोरीवर माहिकासोबतचा स्विमिंग पूलमधील एक अतिशय रोमँटिक फोटो शेअर केलाय. ‘हॅपी बर्थडे माय प्रिन्सेस’ असं म्हणत त्याने तिला प्रेमाने मिठी मारल्याचं या फोटोत स्पष्ट दिसतंय.

हा बोल्ड फोटो समोर येताच इंटरनेटवर एकच मोठी खळबळ उडाली. ही माहिका शर्मा आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडलाय. दिल्लीची असलेली २५ वर्षीय माहिका एक मॉडेल आणि फिटनेस कंटेंट क्रिएटर आहे. विशेष म्हणजे, सध्या सुरू असलेल्या T20 World Cup 2026 मध्ये ती हार्दिकला सपोर्ट करण्यासाठी चक्क श्रीलंकेत पोहोचली आहे. भारत-पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यातही ती गॅलरीत टीम इंडियाला चीअर करताना दिसली होती.

एकीकडे नव्या प्रेमाची सुरुवात आणि दुसरीकडे मैदानावर हार्दिक सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत ४ सामन्यांत ८७ धावा आणि ५ विकेट्स घेत आपली चमक दाखवलीये. नामिबियाविरुद्धच्या सामन्यात तर तो ‘मॅच विनर’ ठरला होता. एकंदरीतच, हार्दिकची बॅट आणि त्याचं प्रेम दोन्ही सध्या तुफान रंगात आलंय, एवढं मात्र नक्की!

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही