Share

‘तो साधाभोळा नाही…… तोच बिग बॉसचा खरा मास्टरमाईंड’; अंकिता वालावलकरने सुरज चव्हाणचा खरा चेहरा आणला समोर!

अंकिता वालावलकरने सुरज चव्हाणवर गंभीर आरोप करत तोच बिग बॉसचा खरा ‘मास्टरमाईंड’ असल्याचा दावा केला आहे. या वक्तव्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.

Published On: 

Ankita Walavalkar on Suraj Chavan: अंकिताचा सुरजवर हल्लाबोल!

रिअ‍ॅलिटी शोच्या जगात जे दिसतं, तेच नेहमी खरं असतं का? बिग बॉसच्या घरात जो अत्यंत साधाभोळा वाटतो, तोच खरा ‘गेमर’ निघाला तर? असाच काहीसा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे.

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातून घराघरात पोहोचलेली अंकिता वालावलकर (Ankita Walavalkar) हिने नुकताच एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. एका ताज्या मुलाखतीत अंकितासह आस्ताद काळे सारख्या कलाकारांनी स्पर्धकांच्या गेम प्लॅनवर सविस्तर चर्चा केली.

Ankita Walavalkar on Suraj Chavan

याच मुलाखतीत अंकिताने थेट पाचव्या सीझनचा विजेता सुरज चव्हाण याच्या खेळीवर बोट ठेवलंय. तिच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. ‘सुरज अजिबात बिचारा नाही, तोच खरा मास्टरमाईंड होता,’ असा थेट दावा तिने केलाय.

अंकिताने सुरजच्या ‘गरीबीच्या कार्ड’वरही सडेतोड निशाणा साधला. ती म्हणाली, “सोशल मीडियावर इमोशन्स विकले जातात. ज्याला जे विकायचंय, तो तेच विकणार.” तिच्या मते, सुरजला गेम खूप आधीच समजला होता. तो अतिशय हुशार आहे आणि लोकांना काय भावेल, हे अचूक ओळखूनच त्याने त्याचा खेळ केला. आपण सगळे त्याच्या साधेपणावर भाळलो, पण प्रत्यक्षात “आम्हीच मूर्ख होतो,” अशी स्पष्ट कबुली तिने दिली आहे.

बिग बॉसच्या घरात जातीवाचक बोलण्यावर जशी बंदी आहे, तशीच ‘परिस्थितीवाचक’ (गरीबीचा बाऊ करण्यावर) बोलण्यावरही बंदी यायला हवी, अशी थेट मागणी अंकिताने केली. घरात नेमकं वागायचं कसं? यावर ती शेवटपर्यंत कन्फ्युज होती. कॅमेऱ्यासमोर ‘सॉरी भाऊ’ म्हणणारे स्पर्धक कॅमेरा बंद होताच कसे फुशारक्या मारायचे, याचाही पाढा तिने वाचला.

एकंदरीतच, सुरजच्या साधेपणामागे एक पक्का प्लॅन होता आणि त्याने हुशारीने प्रेक्षकांची मनं जिंकली, हे अंकिताच्या या दाव्यावरून स्पष्ट होतंय. आता यावर सुरज काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही