एका बाजूला नीट पेपरफुटीच्या (NEET Paper Leak) मुद्द्यावरून दिल्ली पेटली असताना, दुसरीकडे याच आंदोलनावर काहींनी ‘राजकीय अजेंडा’ म्हणून टीका का सुरू केली आहे? केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी अनेक सेलिब्रिटी रस्त्यावर उतरलेत. पण आता ‘बिग बॉस मराठी’ फेम अंकिता वालावलकरने (Ankita Walavalkar) मात्र वेगळीच ठिणगी टाकली आहे.
कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP Protest) नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला अंकिताने थेट विरोध दर्शवला आहे. सोमवारी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जनंतर अनेक कलाकारांनी विद्यार्थ्यांची बाजू घेतली. मात्र, अंकिताने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत, ‘प्रत्येक जण आपापली पोळी भाजून घेतोय’ असं म्हणत सर्वांना सणसणीत चपराक लगावली आहे.
Ankita Walawalkar on CJP
अंकिताने या प्रकरणात एक अत्यंत बोचरा सवाल उपस्थित केला आहे. “जर या आंदोलनामागे खरंच राजकीय अजेंडा नसेल, तर नसरापूरच्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार झाला, तेव्हा एवढ्या मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर का उतरले नाहीत?” असा संतप्त प्रश्न तिने विचारला.
आजही त्या नराधमाला फाशी झालेली नाही, याची आठवण करून देत अंकिता पुढे म्हणाली, “काही प्रकरणांमध्ये हजारो लोक रस्त्यावर येतात आणि काहींमध्ये एकदम शांतता का असते? तीसुद्धा महाराष्ट्राची लेक होती. भडकाऊ पोस्ट करून समाजात तेढ निर्माण करू नका, शांत राहा.”
विशेष म्हणजे, CJP चा एक व्हिडीओ शेअर करत तिने “तुम्हाला वाटत असेल तर अनफॉलो करा, पण माझा या ‘जय हिंद’ला पाठिंबा नाही,” असं ठणकावून सांगितलंय.
दुसरीकडे, रितेश देशमुख, सोनू सूद, सोनाक्षी सिन्हा यांसारख्या बड्या स्टार्सनी आणि गुरफतेह सिंह पीरझादासारख्या तरुण कलाकारांनी या विद्यार्थी आंदोलनाला उघड पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर दोन गट पडल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘तू नको ना पडू यात…’; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताच ‘नॅशनल क्रश’ गिरीजा ओक ट्रोल, नेटकऱ्यांनी केलं अनफॉलो
- राम मंदिरनंतर आता अनुपम खेरांचा CJP आंदोलकांना मोठा सल्ला; म्हणाले विद्यार्थ्यांनो, राजकीय अजेंडा…….
- ‘आपण माणसं नाही, झोंबी झालो आहोत…’; विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवर समीर चौघुलेंचा संताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












