Stock Market : १० रुपयांच्या शेअरने अख्खं मार्केट गाजवलं; ‘ती’ एक बातमी आली अन् रॉकेट झाला!

१० रुपयांच्या शेअरची कमाल! कर्जमुक्तीच्या बातमीने पीसी ज्वेलर्सच्या शेअरमध्ये मोठी उसळी, गुंतवणूकदारांच्या उड्या.

Published On: 

PC Jeweller Share: १० रुपयांच्या शेअरची कमाल!

शेअर मार्केटमध्ये (Share Market) स्वस्तात मस्त शेअर शोधणाऱ्यांची गर्दी काही कमी नसते. पण कधी कधी १० रुपयांचा शेअरही असा काही चमत्कार करतो की मोठमोठे गुंतवणूकदार अवाक होतात. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडलाय एका ज्वेलरी कंपनीच्या बाबतीत. ‘ती’ एक बातमी आली आणि हा १० रुपयांचा शेअर सुसाट सुटला!

आम्ही बोलतोय PC Jeweller या कंपनीबद्दल. बुधवारी मार्केट उघडताच या ज्वेलरी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी खळबळ उडाली. बीएसईवर (BSE) हा शेअर ६ टक्क्यांहून अधिक उसळला आणि १०.२८ रुपयांवर जाऊन पोहोचला. मंगळवारी हा शेअर १० रुपयांवर बंद झाला होता. पण कर्जफेडीची बातमी येताच गुंतवणूकदारांनी खरेदीसाठी एकच झुंबड उडाली.

PC Jeweller Share

या तेजीमागे एक मोठं ठोस कारण आहे. पीसी ज्वेलर्स आता वेगाने ‘कर्जमुक्त’ (Debt Free) होण्याच्या मार्गावर आहे. कंपनीने आतापर्यंत आपलं तब्बल ६८ ते ७० टक्के कर्ज फेडलं आहे. डोक्यावरचं कर्जाचं ओझं हलकं झाल्यामुळे कंपनी आता मोकळा श्वास घेतेय आणि त्याचा थेट परिणाम शेअरच्या किमतीवर दिसतोय. विशेष म्हणजे, गेल्या ५ वर्षांत या शेअरने गुंतवणूकदारांना २५० टक्क्यांहून अधिक रिटर्न (Multibagger Returns) दिले आहेत.

कंपनीची आर्थिक स्थिती (Financials) पाहिली तर ती सुद्धा तगडी दिसतेय. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत कंपनीचा नफा वार्षिक आधारावर २८ टक्क्यांनी वाढून १९०.१० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच काळात हा नफा १४७.९६ कोटी होता. कंपनीचं उत्पन्नही वाढून ९००.५१ कोटी झालंय. थोडक्यात काय, तर १० रुपयांचा हा शेअर सध्या ‘फूल फॉर्म’मध्ये आहे.

(डिस्क्लेमर: ही माहिती केवळ अभ्यासासाठी आहे. मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही