सोनं खरेदी करायचं की नाही? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आधी मार्केटचा हा ‘हायव्होल्टेज ड्रामा’ समजून घ्या. सोन्या-चांदीच्या (Gold Rate Today) बाजारात सध्या जे चाललंय, ते बघून कोणाचंही डोकं चक्रावून जाईल. कारण, रात्री भाव जमिनीवर येतात आणि सकाळी उठेपर्यंत पुन्हा गगनाला भिडतात. असाच काहीसा प्रकार मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी घडलाय.
मंगळवारी रात्री कमोडिटी मार्केटमध्ये (MCX) मोठी उलथापालथ झाली. चांदीचे भाव एका रात्रीत तब्बल ५ टक्क्यांनी गडगडले, तर सोन्याच्या भावातही अडीच टक्क्यांची मोठी घसरण झाली. रात्री ८.३० च्या सुमारास चांदी २ लाख २६ हजार रुपयांच्या घरात आली होती. मात्र, खरी गंमत आज (बुधवारी) सकाळी झाली.
Gold Rate Today
रात्री मोठी घसरण झाल्यानंतर गुंतवणूकदारांना वाटलं की आज स्वस्तात सोनं मिळेल. पण बुधवारी सकाळी MCX मार्केट सुरू होताच सोन्या-चांदीने पुन्हा ‘यु-टर्न’ घेतला. आज सकाळी चांदीने जोरदार उसळी घेत २ लाख ३४ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला. म्हणजेच मार्केट आता Recovery Mode मध्ये आलं आहे.
दुसरीकडे, सोन्यानेही आपली चाल बदलली. काल रात्री १,५१,४१८ रुपयांवर बंद झालेलं सोनं आज सकाळी १.१५ टक्क्यांनी वाढून १,५३,१६५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलं.
सध्याची रिकव्हरी पाहिली तरी ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. २९ जानेवारी २०२६ ला सोन्याने १ लाख ९३ हजारांचा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. त्या तुलनेत आजचा भाव पाहिला तर सोनं अजूनही उच्चांकापेक्षा तब्बल ४०,००० रुपये प्रति १० ग्रॅम स्वस्त आहे. चांदीचीही तीच परिस्थिती आहे; ४.२० लाखांवरून चांदी निम्म्यावर आली आहे. त्यामुळे लग्नसराईसाठी खरेदी करणाऱ्यांनी रोजचे दर तपासूनच निर्णय घ्यावा, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘मुंबईत राहतो तर मराठी…’; हिटमॅन रोहित शर्माच्या ‘त्या’ एका वाक्याने जिंकलं महाराष्ट्राचं मन!
- मैदानात चौकार-षटकार, पण वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी थेट सांगितलं…
- भाईजानच्या वडिलांची प्रकृती बिघडली; पहाटे तातडीने ICU मध्ये हालवले!
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








