📰
आमचं App डाउनलोड करा! ⭐⭐⭐⭐⭐
सर्वात आधी ताज्या बातम्या मिळवा — Free!
Download करा
Share

मैदानात चौकार-षटकार, पण वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी थेट सांगितलं…

U-19 स्टार वैभव सूर्यवंशीने १०वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी मारली असून तो सध्या नागपुरात राजस्थान रॉयल्सच्या आयपीएल तयारीमध्ये व्यस्त आहे.

Published On: 

Vaibhav Suryavanshi Exam: १०वीच्या पेपरला दांडी, कारण...

🕒 1 min read

क्रिकेटच्या मैदानात भल्याभल्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडणारा हा पठ्ठ्या, पण अभ्यासाच्या मैदानात मात्र याने चक्क माघार घेतलीये? होय, हे खरंय. भारताचा U-19 वर्ल्ड कप स्टार वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) पुन्हा एकदा चर्चेत आलाय, पण यावेळी कारण त्याची तुफानी बॅटिंग नाही, तर त्याची १०वीची परीक्षा आहे. वयाच्या अवघ्या काहीराव्या वर्षी गोलंदाजांची झोप उडवणाऱ्या वैभवने बोर्डाच्या महत्त्वाच्या पेपरकडे चक्क पाठ फिरवली आहे.

यंदा वैभवची १०वीची (SSC/CBSE) परीक्षा होती. १७ फेब्रुवारीला पहिला पेपर होता, पण वैभव परीक्षा केंद्रावर पोहोचलाच नाही. यावर बोलताना पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे प्रिन्सिपॉल एन. के. सिन्हा यांनी स्पष्ट केलं की, “वैभव आज परीक्षेला आला नाही. शाळेच्या आणि बोर्डाच्या नियमानुसार आम्ही त्याची गैरहजेरी (Absent) लावली आहे. आम्हाला वाटलं होतं तो येईल, पण तसं झालं नाही.”

Vaibhav Suryavanshi Exam

आता प्रश्न पडतो की, वैभवने इतकी महत्त्वाची परीक्षा का सोडली? तर त्याचं उत्तर आहे IPL 2026. वैभवचे कोच मनीष ओझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव सध्या परीक्षेपेक्षा क्रिकेटवर फोकस करतोय. तो सध्या नागपुरात असून Rajasthan Royals च्या प्री-सीझन कॅम्पमध्ये घाम गाळतोय. येत्या २६ मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू होतोय आणि राजस्थानच्या टीममध्ये वैभवची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जातेय.

U-19 वर्ल्ड कप गाजवणाऱ्या या पठ्ठ्याला अभ्यासासाठी वेळच मिळाला नाही, असंही बोललं जातंय. प्रिंसिपल सिन्हा यांनीही आशा व्यक्त केलीये की, “सध्या तो टुर्नामेंटमध्ये व्यस्त असेल, पण पुढच्या वेळी तो नक्की परीक्षा देईल.” थोडक्यात काय, तर वैभवसाठी सध्या तरी ‘डिग्रीपेक्षा’ ‘ड्रीम’ महत्त्वाचं ठरलंय!

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!