Share

Bigg Boss Marathi : ‘आवडते मला रूचिता .. ‘; विशालच्या ‘त्या’ कबुलीने घरात खळबळ, नवा लव्ह अँगल?

बिग बॉसच्या घरात विशाल कोटियनने रुचिता जामदारबद्दल व्यक्त केल्या भावना; १५ वर्षांच्या वयाच्या अंतरावरून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, प्रोमो व्हायरल.

Published On: 

Bigg Boss Marathi 6: विशाल-रुचिताच्या प्रेमाची कबुली; वयाच्या अंतरावरून ट्रोल!

बिग बॉसच्या घरात प्रेम फुलणं नवीन नाही, पण यावेळी जे घडलंय ते पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. प्रेमाचा हा ‘खेळ’ खरा की फक्त टीआरपीचा स्टंट? हा प्रश्न तुम्हालाही पडेल, कारण घरात आता एका नव्या जोडीची चर्चा रंगली आहे. करण सोनावणेच्या एक्झिटनंतर एक लव्ह स्टोरी अर्ध्यावर राहिली असतानाच, आता विशाल कोटियन (Vishal Kotian) आणि रुचिता जामदार (Ruchita Jamdar) यांच्यात काहीतरी शिजतंय!

सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 6) घरात नात्यांची समीकरणं सेकंदाला बदलत आहेत. या आठवड्यात कलर्स मराठीने शेअर केलेल्या एका प्रोमोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. यात रुचिता आपली सहस्पर्धक अनुश्रीजवळ मन मोकळं करताना दिसते. “मला त्याचा (विशालचा) प्रेझेन्स आवडतो… घरातले माझ्या चुका काढत असताना तो माझ्या बाजूने पॉझिटिव्ह बोलतो. मी त्याच्याशी खूप अटॅच आहे,” अशी कबुली रुचिताने दिली आहे.

Vishal Kotian Ruchita Jamdar Love Story

इकडे विशालनेही आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. नॉमिनेशन टास्कदरम्यान आणि अनुश्रीशी बोलताना विशालने वयाचं अंतर मान्य करत एक मोठं वक्तव्य केलं. तो म्हणाला, “आमच्यात १५ वर्षांचा फरक आहे. एखादीच अशी व्यक्ती असते जी आपल्याला आवडू शकते आणि तशी ती मला आवडते.” विशालच्या या जाहीर कबुलीने घरात एकच चर्चा सुरू झाली आहे.

दुसरीकडे, या ‘लव्ह स्टोरी’मध्ये वादाची फोडणीही पडली आहे. दिपाली सय्यदने “हे प्रकरण घराबाहेरही चालू ठेवावं,” असा टोला लगावताच रुचिताचा पारा चढल्याचं पाहायला मिळालं. मात्र, सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या जोडीला चांगलंच धारेवर धरलंय. काहींना ही जोडी आवडली आहे, तर काहींनी वयाच्या अंतरावरून त्यांना ट्रोल केलंय. एका युजरने तर थेट, “एकतर रुचिताला बाहेर काढा किंवा त्या म्हाताऱ्या विशालला तरी,” अशी कमेंट करत संताप व्यक्त केलाय. आता हा प्रेमाचा अंक खरा की खेळाचा भाग, हे येणारा काळच ठरवेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install