हर्षवर्धन सपकाळांकडून टिपू सुलतानची शिवरायांशी तुलना; संतापलेल्या मराठी अभिनेत्याचा थेट इशारा, म्हणाला…

काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना थेट छत्रपती शिवरायांशी केल्याने वाद पेटलाय. यावर अभिनेता अभिजीत केळकरची संतप्त पोस्ट चर्चेत आली आहे.

Published On: 

Abhijeet Kelkar: टिपू सुलतान वादात अभिनेत्याची उडी!

राजकारणात कधी कोणता मुद्दा तापेल आणि कुणाची जीभ घसरेल, याचा काहीही नेम नाही. याचाच प्रत्यय आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा आलाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आणि संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. या विधानावरून राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया येत असतानाच, आता मराठी मनोरंजन विश्वातूनही मोठा संताप व्यक्त होऊ लागलाय.

नेहमीच सामाजिक आणि राजकीय विषयांवर बेधडक बोलणारा लोकप्रिय अभिनेता अभिजीत केळकर याने या वादावर उडी घेतली आहे. सोशल मीडियावर अभिजीत केळकर (Abhijeet Kelkar) याने केलेली एक मार्मिक पोस्ट सध्या वाऱ्यासारखी व्हायरल होतेय.

Abhijeet Kelkar Post 

सपकाळांच्या या विधानाचा समाचार घेताना अभिजीतने लिहिलंय, “आज महाराज असते तर अशांना ‘टिपू’न ‘टिपू’न मारले असते.” त्याच्या या सूचक आणि धारदार शब्दांनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं असून, चाहत्यांनी या पोस्टवर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापूर्वीही मुंब्रा येथील एका नगरसेविकेच्या वादग्रस्त विधानावर त्याने असं सडेतोड मत मांडलं होतं.

मालेगावच्या उपमहापौरांच्या कक्षात लावलेल्या टिपू सुलतानच्या फोटोवरून हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. यावर माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी, “शौर्याचे लक्षण म्हणून टिपू सुलतान यांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितले पाहिजे,” असं अजब विधान केलं.

या एका विधानाने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर कडाडून टीका करत सपकाळांना जाहीर माफी मागण्याची मागणी केली आहे. मतांसाठी इतके लांगूलचालन कधी पाहिलं नसल्याची घणाघाती टीका त्यांनी केलीय.

“लाखो हिंदूंची हत्या करणाऱ्या टिपू सुलतानाची तुलना शिवरायांशी करणं अत्यंत निंदनीय आहे,” अशा शब्दांत फडणवीसांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. एकूणच काय, तर या वादग्रस्त विधानामुळे राज्यात मोठा गदारोळ माजला असून, आता पुढे काय राजकीय पडसाद उमटतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही