Share

विजयानंतर कॅप्टन सूर्याची ‘ती’ पोस्ट वादळी ठरली; फक्त ३ शब्दांत पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ!

पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादवने ‘हर हर महादेव’ म्हणत शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Published On: 

Suryakumar Yadav Post: पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर 'ती' पोस्ट व्हायरल!

मैदानात पाकिस्तानला लोळवल्यानंतर खरी चर्चा रंगली ती सोशल मीडियावर. भारताने ६१ धावांनी सामना जिंकला हे तर खरंच, पण त्यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) जे केलं, त्याने इंटरनेटचा पारा चढलाय. विजयाच्या जल्लोषात सूर्याने इन्स्टाग्रामवर टाकलेली एक पोस्ट सध्या पाकिस्तानच्या पराभवापेक्षा जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे.

कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर पाकिस्तानचा पुरता धुव्वा उडवल्यानंतर, ड्रेसिंग रूममधील सेलिब्रेशनचे फोटो सूर्याने शेअर केले. पण फोटोपेक्षा लक्ष वेधलं ते त्याच्या कॅप्शनने.

Suryakumar Yadav Post

सूर्याने केवळ ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) असे तीन शब्द लिहित विजयाचा आनंद व्यक्त केला. या तीन शब्दांनी भारतीय चाहत्यांची मनं जिंकली, तर काहींच्या मते हे पाकिस्तानसाठी एक कडक ‘सायलेंट’ उत्तर होतं. या पोस्टवर सध्या लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने पाकिस्तानच्या गोलंदाजांची पिसे काढली. ईशान किशनने ७७ धावांची आक्रमक खेळी करत भारताला १७५ धावांपर्यंत नेलं. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्ध भारताने उभारलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे. टिळक वर्मा आणि रिंकू सिंगनेही मोलाची साथ दिली.

१७६ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची दाणादाण उडाली. बुमराह आणि हार्दिक पांड्याने सुरुवातीलाच धक्का दिल्याने पाकिस्तानचा डाव अवघ्या ११४ धावांत संपुष्टात आला. सामन्यानंतर बोलताना सूर्या म्हणाला, “या खेळपट्टीवर १५५ धावा पुरेशा होत्या, पण आम्ही १७५ केल्याने सामना तिथेच जिंकलो होतो.” ईशानच्या खेळीचंही त्याने भरभरून कौतुक केलं.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही