📰
आमचं App डाउनलोड करा! ⭐⭐⭐⭐⭐
सर्वात आधी ताज्या बातम्या मिळवा — Free!
Download करा
Share

PM Modi Interview: ‘फक्त नफ्यामागे धावू नका…’; मोदींचा बड्या कंपन्यांना कडक संदेश, नेमकं काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासगी क्षेत्राला नफ्यापेक्षा गुणवत्तेवर भर देण्याचा सल्ला दिला आहे. भारत जगातील दुसरा मोठा मोबाईल उत्पादक बनल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.

Published On: 

PM Modi Interview: खासगी क्षेत्राला कानमंत्र! नफ्यापेक्षा 'या' गोष्टीवर द्या भर

🕒 1 min read

“धंदा म्हटलं की फक्त नफा, हे समीकरण वर्षानुवर्षे आपल्या डोक्यात फिट बसलंय. पण आता हे चित्र बदलायची वेळ आली आहे…” असा थेट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील उद्योगजगताला दिला आहे. नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला आणि अमेरिका-युरोपसोबत महत्त्वाचे करारही झाले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी (PM Modi) ‘पीटीआय’ला (PTI) दिलेल्या मुलाखतीत खासगी क्षेत्राचे कान टोचले आहेत. ‘विकसित भारता’चं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर फक्त बॅलन्स शीट बघू नका, तर गुणवत्तेकडे (Quality) लक्ष द्या, असा ‘कानमंत्र’ त्यांनी दिलाय.

मोदींनी यावेळी एक धक्कादायक पण अभिमानास्पद आकडेवारी शेअर केली. ते म्हणाले, “एक काळ असा होता जेव्हा आपण सर्व मोबाईल बाहेरून मागवायचो. पण आज चित्र पालटलंय. भारत आता जगातील दुसरा सर्वात मोठा मोबाईल उत्पादक देश बनला आहे.” हे यश कशामुळे आलं? तर सरकारने ‘Make in India’ ला दिलेलं बळ आणि खासगी क्षेत्राची साथ.

PM Modi Interview

रोजगाराच्या मुद्द्यावर बोलताना मोदींनी स्टार्टअप्सचं उदाहरण दिलं. दहा वर्षांपूर्वी देशात जेमतेम काहीशे स्टार्टअप्स होते, तो आकडा आज २ लाखांच्या घरात पोहोचला आहे. ही काही सामान्य गोष्ट नाही. हे स्टार्टअप्सच आजच्या तरुणांना रोजगार देत आहेत.

‘बजेट २०२६’ हे उत्पादन क्षेत्राला (Manufacturing) बुस्टर देणारं आहे, असं मोदींनी स्पष्ट केलं. पण सरकार फक्त रस्ता बनवू शकतं, गाडी तर खासगी क्षेत्रालाच चालवायची आहे. त्यामुळे कंपन्यांनी आता संशोधनावर (R&D) खर्च वाढवावा आणि जागतिक बाजारात टिकेल असं उत्पादन बनवावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे. “स्पर्धा नफ्याची नको, तर गुणवत्तेची करा,” हा मोदींचा संदेश उद्योगपतींच्या किती पचनी पडतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!