तुमच्या भागातही गेल्या काही तासांपासून पावसाची रिपरिप थांबायचे नाव घेत नाहीये का? तर सावध राहा, कारण हवामान विभागाने (IMD Rain Alert) पुढील काही दिवसांसाठी राज्यभरात अत्यंत चिंताजनक इशारा दिला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने (Maharashtra Weather) तुफान धुमाकूळ घातला आहे. जून महिना कोरडा गेल्यानंतर आता जुलै आणि ऑगस्टच्या सुरुवातीलाच नद्या-नाले तुडुंब भरून वाहत असून अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
Maharashtra Rain Alert
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, आज नाशिक आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, नंदुरबार, कोल्हापूर, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आलाय. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या पट्ट्यात कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होत असल्याने पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.
अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने पूल पाण्याखाली गेले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून काल अनेक जिल्ह्यांतील शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या होत्या. प्रशासनाने अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे स्पष्ट आवाहन केले आहे.
धरणांच्या पातळीतही प्रचंड वाढ झाली असून पुण्यातील (Pune Rain) खडकवासला धरणातून दुपारी या वर्षातील सर्वाधिक म्हणजेच ४३,५०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता, जो नंतर ३७ हजार क्यूसेक्सवर आणला गेला. जर पाऊस असाच सुरू राहिला, तर राज्यात अतिवृष्टीचे मोठे संकट उभे ठाकू शकते.
दुसरीकडे, या पावसाने बळीराजाचे अतोनात नुकसान केले आहे. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील उचेगाव येथील शेतकरी उल्हास जाधव यांच्या शेतातील तब्बल ७० बकऱ्या आणि कोंबड्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. त्यासोबतच कपाशी, सोयाबीन, तूर आणि हळदीची पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मुकेश खन्नांचा CJP आंदोलकांवर संताप; जेन झिंना खडसावत म्हणाले, ‘घाणेरड्या गटारातील किडे…’
- तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता थेट बॉलिवूडकडे; शूटिंगच्या सेटवरील जेवणावरून मोठी कारवाई होणार?
- Commonwealth Games 2026 : भारताची दुहेरी कमाई! नीरज चोप्राचे सिल्वर, यशवीरच्या शेवटच्या थ्रोने भारताला कांस्य!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












