जंतरमंतरवरील आंदोलनात पंतप्रधानांना शिव्या देणारे ते तरुण खरंच विद्यार्थी होते की आणखी कुणी? याच प्रश्नावरून आता अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी थेट ‘शक्तिमान’ अवतार धारण करत आंदोलकांची चांगलीच कानउघडणी केली आहे.
खासदार कंगना राणौतनंतर आता मुकेश खन्ना यांनी कॉक्रोच जनता पार्टी (CJP) आणि तथाकथित जेन झी (Gen Z) आंदोलकांवर सडकून टीका केली आहे. त्यांनी या तरुणांना थेट ‘झुरळ’ आणि ‘गटारीतले किडे’ म्हणत सोशल मीडियावर आपला तीव्र संताप व्यक्त केला.
Mukesh Khanna on CJP
सध्या भारताबाहेर असलेल्या खन्ना यांनी एक व्हिडिओ शेअर करून देशातील परिस्थितीवर भाष्य केलं आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, रात्रीच्या वेळी पार्टी करताना दिसलेले आणि शिवीगाळ करणारे लोक खऱ्या अर्थाने NEET किंवा पेपरफुटीचे पीडित विद्यार्थी असूच शकत नाहीत. हा सर्व प्रकार म्हणजे सरकार पाडण्याचा एक मोठा कट असल्याचा दावा त्यांनी केलाय.
“घरात झुरळ आल्यावर आपण जसं त्यांना बाहेर काढतो, तसंच या घाणेरडी भाषा वापरणाऱ्यांना हाकललं पाहिजे,” असं खन्ना अत्यंत आक्रमकपणे म्हणाले. हे एक ‘स्पॉन्सर्ड’ आंदोलन असून काही जण केवळ पैशांसाठी देशाला अस्थिर करत असल्याचा मोठा गौप्यस्फोट त्यांनी या व्हिडिओत केला आहे.
दुसरीकडे, या भरकटलेल्या तरुणांना खन्ना यांनी भविष्यातील गंभीर परिणामांची जाणीव करून दिली आहे. अशा भयंकर कृत्यांमुळे भविष्यात कुणीही कामावर ठेवणार नाही, व्हिसा नाकारला जाईल आणि पोलिसांची तसेच सरकारी मदतही बंद होईल, असा थेट इशारा त्यांनी दिलाय.
त्यामुळेच, या खोट्या आंदोलनांच्या विळख्यातून वेळीच बाहेर पडा, असा सल्लाही त्यांनी जेन झींना दिला आहे. सध्या त्यांच्या या व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता थेट बॉलिवूडकडे; शूटिंगच्या सेटवरील जेवणावरून मोठी कारवाई होणार?
- Commonwealth Games 2026 : भारताची दुहेरी कमाई! नीरज चोप्राचे सिल्वर, यशवीरच्या शेवटच्या थ्रोने भारताला कांस्य!
- रखडलेल्या झेडपी निवडणुकांचा मार्ग मोकळा? OBC आरक्षणाचे समीकरण बदलणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












