‘माझी वेगळी जवानी तुम्ही पाहिली तरी कधी?’ रामदेव बाबांवर कंगना संतापली

कंगना राणौतने रामदेव बाबांच्या टीकेला सडेतोड उत्तर देत त्यांच्या वक्तव्यावर जोरदार पलटवार केला.

Published On: 

Kangana Ranaut attacks Ramdev Baba

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत (Kangana Ranaut) व योगगुरू रामदेव बाबा (Ramdev Baba) यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे. कंगनाने रामदेव बाबांवर जोरदार टीका केली आहे.

यापूर्वी तिने जंतर-मंतरवरील ‘जन-झेड’ (Gen-Z) आंदोलकांना ‘गटर जनरेशन’ असे म्हटले होते, ज्यावर रामदेव बाबांनी तिच्याबद्दल वैयक्तिक टिप्पणी केली होती. यामुळे संतापलेल्या कंगनाने त्यांना सडेतोड उत्तर दिले आणि विचारले, तुम्ही माझ्या जवानीची चिंता करू नका. तुम्ही तारुण्यात काय बेडरूममध्ये वटवाघुळासारखे लटकलेले होते का?

Kangana Ranaut attacks Ramdev Baba

रामदेव बाबा आणि कंगना राणौत यांच्यातील वाद शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. नुकत्याच एका मुलाखतीत कंगनाने पुन्हा एकदा रामदेव बाबांवर निशाणा साधला. जेव्हा रामदेव बाबांनी ‘स्वदेशी’ चळवळ सुरू केली, तेव्हा सरकारने त्यांना पाठिंबा दिला होता. मात्र, आता ते भांडवलशाहीच्या जाळ्यात पूर्णपणे अडकले आहेत असे तिला वाटते. कारण सनातनी विचारधारा तर भांडवलशाहीशी क्लॅश करते.

कंगनाने त्यांच्यावर भांडवलदार बनल्याचा आरोप केला आणि म्हटले की, त्यांनी लोकांच्या जमिनी बळकावल्या आहेत. ज्यामुळे लोकांमध्ये संताप निर्माण झाला. तसेच एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारले होते. आयुर्वेद, औषधी वनस्पती, औषधे आणि योग यांपासून लक्ष हटवून आता बनियान, अंडरगार्मेंट्स यात भांडवल शोधत आहेत. आता ते पूर्णपणे व्यावसायिक झाले आहे.

“रामदेव बाबा उद्योगपती झाले यावर काहीच हरकत नाही आहे. पण मग तुम्ही सनातनी वस्त्र घालू नये. रामदेवबाबा ज्या बनियान आणि अंडरगार्मेंट्स विकत आहेत, त्या सनातनी आहेत काय? त्यात त्यांचे ढोंग आणि दांभिकता दिसत आहे. रामदेवबाबांसारखे लोक सनातनींना अपमानित करणार असेल तर कोण सहन करेल? असा सवाल कंगनाने केला. तसेच हिंदू धर्मानुसार मार्गक्रमण करणं ही एक तपस्या आहे, अशी कंगना म्हणाली.

दरम्यान, कंगनाने आंदोलकांना ‘गटर जनरेशन’ असे संबोधले होते. या प्रकरणावर रामदेव बाबांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी कंगनावर कडक टीका केली. त्यांनी प्रश्न केला की, तिने स्वतःचे बालपण खरोखर अनुभवले आहे का? ते कसे होते? आणि तिने तिची जवानी पाहिली आहे काय?

कंगनाने या टिप्पण्यांना प्रत्युत्तर दिले. तिने विचारले की, रामदेव बाबांनी स्वतःचे तारुण्य बेडरूममध्ये वटवाघळासारखे उलटे लटकून घालवले होते का?.
तुम्ही काय पाहिलं? हे सांगितलं पाहिजे.

अशा प्रकारच्या थुकरट गोष्टी करणं त्यांना शोभत नाही. माझं बालपणही इतर मुलींसारखंच गेलं. काही रिलेशनशीप होत्या. त्या सर्वांना माहीत आहे. त्यापेक्षा त्यांनी काय अशी माझी वेगळी जवानी पाहिली? त्यांनी काही मर्यादा सोडू नये, असा संताप कंगनाने रामदेव बाबांवर व्यक्त केला.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही