Share

‘आपल्या मुली अशी भाषा कशी वापरू शकतात?’; आईवरून शिव्या देणाऱ्यांना मोदींची अनपेक्षित माफी

जंतर-मंतरवर शिवीगाळ करणाऱ्या मुलांना पंतप्रधान मोदींनी इन्स्टाग्राम व्हिडिओद्वारे माफ केल्याची घोषणा केली आहे. चुकांमधून शिकून देशासाठी एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं.

Published On: 

PM Narendra Modi instagram video talking about Jantar Mantar youth

दिल्ली– पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नुकताच रात्रीच्या वेळी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. यात त्यांनी थेट जंतर-मंतरवर घडलेल्या प्रकारावर भाष्य केलंय. काही खोडकर मुला-मुलींनी त्यांना आणि त्यांच्या आईला उद्देशून अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरली. हा धक्कादायक प्रकार देशानं आणि जगानं पाहिला.

यावर मोदींनी काय प्रतिक्रिया दिली असेल? तर, त्यांना या मुलांवर कोणतीही कायदेशीर कारवाई नकोय. थोडक्यात सांगायचं तर, त्यांना या सर्व मुलांना माफ करायचंय. “हा एक मोठा सांस्कृतिक धक्का आहे. आपल्या मुली अशी भाषा कशी काय वापरू शकतात?” असा उद्विग्न सवाल त्यांनी केला. पण दुसरीकडे, लहान असताना मुलांकडून चुका होतात आणि हेच लहानपणाचं लक्षण असल्याचंही ते म्हणाले.

PM Narendra Modi: ‘दात आपलेच आणि जीभही आपलीच’

“कधी कधी जेवताना दातांमध्ये जीभ चावली जाते, रक्त येतं. म्हणून आपण दात थोडेच तोडतो? कारण दातही आपलेच आणि जीभही आपलीच असते,” असं अगदी साधं आणि मार्मिक उदाहरण मोदींनी दिलं. समाजातील आक्रोश आपण समजू शकतो. पण मुलांना शिक्षा देऊन, त्यांना कोर्टाच्या फेऱ्या मारायला लावून परिस्थिती बदलणार नाही, अशी त्यांची ठाम भूमिका आहे.

या भरकटलेल्या मुलांना शिक्षा देण्याऐवजी, त्यांना जवळ घेऊन योग्य मार्ग दाखवणं आपलं काम आहे, असं मोदी म्हणाले. शेवटी त्यांनी देशाच्या प्रगतीसाठी या मुलांना सोबत येण्याचं आवाहन केलं. “मी तुमच्यासाठीच जगतोय, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करतोय,” हा भावनिक संदेश देत त्यांनी जुन्या चुकांमधून शिकून एकत्र पुढे जाण्याचं आवाहन तरुणांना केलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही