Share

मोदी सरकारची मोठी घोषणा; PM-KISAN योजनेला 2030-31 पर्यंत मुदतवाढ

केंद्र सरकारने PM-Kisan Yojana ला 2030-31 पर्यंत मुदतवाढ देत 3.15 लाख कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.

Published On: 

Modi government extends PM Kisan Yojana 

PM Kisan Scheme: राज्यातील महायुती सरकारने अलीकडेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना फायदा झाला आणि त्यांना मोठा दिलासा मिळाला. या राज्यस्तरीय निर्णयानंतर, केंद्र सरकारनेही शेतकऱ्यांना (Farmers) एक मोठी भेट दिली आहे. केंद्राने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे, ज्याचा फायदा देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना होणार आहे.

मोदी सरकारने (Modi government) ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ (PM-Kisan Yojana) योजनेचा कालावधी आणखी पाच वर्षांनी वाढवून (Extended) तो २०३०-३१ पर्यंत केला आहे. या उद्देशासाठी ३.१५ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती दिली. यासोबतच, मंत्रिमंडळाने ‘प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजना’ (PM-SSY) ला मुदतवाढ देण्यासही मंजुरी दिली.

Modi government extends PM Kisan Yojana 

PM Kisan yojanaचे लाभार्थी असलेले शेतकरी सध्या २४ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. अशा पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ही मोठी घोषणा करत योजनेला पुढील पाच वर्षांसाठी मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना PM Kisan yojana चा २४ वा हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारी आकडेवारीनुसार…

आतापर्यंत या योजनेअंतर्गत २३ हप्त्यांच्या माध्यमातून ४.४७ लाख कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, ९.४९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना २३ वा हप्ता मिळाला आहे. लाभार्थ्यांमध्ये महिला शेतकऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. या योजनेच्या प्रत्येक चार लाभार्थ्यांपैकी एक महिला शेतकरी आहे.

दरम्यान, योजनेला आणखी पाच वर्षांची मुदतवाढ मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची एक मोठी चिंता दूर झाली आहे आणि या कालावधीत त्यांच्या बँक खात्यात निधी जमा होणे सुरूच राहणार आहे. ही योजना आता २०३०-३१ पर्यंत वाढवण्यात आली असून त्यासाठी ३.१५ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही