Kolhapur : कोल्हापुरातील गर्भपाताच्या प्रकरणांची व्याप्ती मोठी आहे. सरकारी सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी अशा कारवायांमध्ये सहभागी असणे ही गंभीर बाब आहे. या प्रकरणांचा तपास सुरू असून, यात अनेकांची नावे समोर येण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री (Health Minister) आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी दिली. (Kolhapur Sex Determination Case)
मुलींच्या जन्माचे घटते प्रमाण या समस्येकडे आम्ही अत्यंत गांभीर्याने पाहत आहोत आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्यावर भर देत आहोत. गेल्या आठवड्यात स्वप्नील पाटील यांच्यावर केलेल्या कारवाईदरम्यान या डॉक्टरांचे नाव समोर आले. बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचण्या आणि गर्भपाताच्या विरोधात कारवाई करण्यासाठी राज्यस्तरीय ‘टास्क फोर्स’ची स्थापना करण्यात आली आहे.
Health Minister announces possible MCOCA action in Kolhapur
महिला लोकप्रतिनिधींशी झालेल्या चर्चेनंतर जिल्हा स्तरावर अंमलबजावणीची कार्यवाही गतिमान करण्यासाठी या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली. अशा गुन्ह्यांमधील आरोपींवर ‘मकोका’ (MCOCA – Maharashtra Control of Organised Crime Act) अंतर्गत कारवाई करण्याच्या निर्णयाबाबत यापूर्वीच दोन बैठका झाल्या आहेत. विधिमंडळाच्या पुढील अधिवेशनापूर्वी संबंधित कायदा सादर केला जाण्याची अपेक्षा आहे. कायदा व न्याय विभागाच्या निर्देशानुसार या प्रस्तावात काही सुधारणा करण्यात आल्या आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- RBI चा नवा फॉर्म्युला! नियम बदलले; मोठ्या ठेवींना मिळणार वेगवेगळे व्याजदर
- “अमित शाह इस्तीफा दो”; काँग्रेसची सोशल मीडियावरून जोरदार मोहीम; केंद्र सरकारवर निशाणा
- ‘40 लाख कथित बांगलादेशींनी भरले गणना पत्र’; SIR प्रक्रियेवर किरीट सोमय्यांचा मोठा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












