Share

मंगेशकर रुग्णालय प्रकरणात कारवाई लवकरच; आरोग्यमंत्री आबिटकर यांची माहिती

Pune – Maharashtra Health Minister Prakash Abitkar has stated that three separate departments are investigating the death of pregnant woman Tanisha Bhise at Dinanath Mangeshkar Hospital.

He informed the media that inquiries are being conducted by the state’s Law Department, Health Department, and Pune’s Sassoon Hospital. The hospital operates under the Charitable Trust Act, hence the legal scrutiny.

Health Minister Prakash Abitkar on Dinanath Mangeshkar Hospital Probe

🕒 1 min read

पुणे | प्रतिनिधी

पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भवती महिला तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्यानंतर, या प्रकरणात आता रुग्णालयावर कारवाई होण्याची शक्यता आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, सध्या रुग्णालयाची चौकशी तीन वेगवेगळ्या विभागांकडून सुरू असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. ( 3-Way Probe into Death at Dinanath Hospital: Action Soon, Says Maharashtra Health Minister )

आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले, “मंगेशकर रुग्णालयाची चौकशी धर्मादाय आयुक्त कार्यालय, राज्याचा आरोग्य विभाग आणि ससून रुग्णालय या तीन यंत्रणांकडून करण्यात येत आहे. संबंधित रुग्णालय धर्मादाय कायद्यानुसार चालवलं जात असल्याने कायदा विभागाचाही यात समावेश आहे. तीनही विभागांचे अहवाल मिळाल्यानंतर कारवाईसंदर्भात ठोस पावले उचलली जातील.”

Health Minister Prakash Abitkar on Dinanath Mangeshkar Hospital Probe

कारवाईस विलंब होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आबिटकर यांनी स्पष्ट केलं की, “कोणत्याही रुग्णालयात अनियमितता किंवा रुग्णांना त्रास होणार नाही, याची खात्री करणे हीच शासनाची भूमिका आहे. सध्या चौकशी समित्यांच्या कामावर संशय घेतला जात आहे. मात्र, अंतिम अहवाल आल्यावरच योग्य निर्णय घेतला जाईल.”

मंत्री आबिटकर यांनी पुढे सांगितले की, “रुग्णास त्रास झाला असल्यास आणि यामध्ये दिरंगाई झाल्याचे पुरावे आढळल्यास जबाबदारांवर कारवाई करण्यात येईल. पुढील दोन ते तीन दिवसांत चौकशी अहवाल अपेक्षित असून त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.”

महत्वाच्या बातम्या

 

Youtube

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Crime Health Maharashtra Marathi News Politics Pune

Join WhatsApp

Join Now