🕒 1 min read
Vijay Wadettiwar | पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या तनिषा भिसे (Tanisha Bhise) यांना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळं रुग्णालय प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त होताना दिसत आहे. दरम्यान, या प्रकरणी विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबावर हल्लाबोल केला आहे.
Vijay Wadettiwar Criticized Mangeshkar Family
मंगेशकर कुटुंब माणुसकीला कलंक असल्याचं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. मंगेशकर कुटुंबीय लुटारूंची टोळी आहे. त्यांनी दान केल्याचं कधी कुणी पाहिलं आहे का?, असा सवाल विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. गरिबाचे शोषण करणाऱ्यांना साथ देऊ नये. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
“केवळ चांगलं गाणं म्हटलं म्हणून त्यांचा उदो उदो केला. समाजासाठी त्यांचा प्रत्यक्ष सहभाग किंवा दानशूरता फारशी दिसून आलेली नाही. ज्या खिलारे पाटलांनी दवाखान्यासाठी जमीन दिली त्यांना सोडलं नाही. माणुसकीच्या नावावर कलंक असणारे कुटुंब आहे”, अशी घणाघाती टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- “धनंजय मुंडे औरंगजेबापेक्षा…”; Karuna Munde यांचा खळबळजनक दावा
- Walmik Karad याची संपत्ती जप्त होणार?; उज्ज्वल निकम यांनी दिली मोठी माहिती
- “शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आणि आजही…”; Ajit Pawar यांचं विधान चर्चेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











