Share

“शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आणि आजही…”; Ajit Pawar यांचं विधान चर्चेत

Ajit Pawar statement about sharad pawar

Ajit Pawar । 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आणि अजित पवार विरुद्ध शरद पवार असे दोन गट निर्माण झाले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही गटातील नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. तेव्हापासूनच अजित पवार आणि शरद पवार भविष्यात एकत्र येणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागेलेलं आहे. अशातच अजित पवार (Ajit Pawar) यांनी एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत केलेलं एक विधान सध्या चर्चेत आहे.

Ajit Pawar Statement About Sharad Pawar

“शरद पवार कालही आमचे दैवत होते आणि आजही मानतो”, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पिंपरीत विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त उपस्थित असताना अजित पवार यांनी हे विधान केलं.

अजित पवार म्हणाले, “घरामध्ये आम्ही शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आणि आजही मानतो. पण कुठेतरी आपल्या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा मजबूत नेता मिळाला आहे. आज त्यांच्या पाठीशी उभ राहणं आणि देशाची प्रगती करून घेणे गरजेचे आहे. जगामध्ये देशाचा मानसन्मान वाढवण्यासाठी त्यांना पाठबळ देणं काम होतं म्हणून आपण त्या ठिकाणी असं केलं.” दरम्यान, अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळं आता दोन्ही पवार गट एकत्र येणार का? अशी देखील चर्चा रंगली आहे.

महत्वाच्या बातम्या :

“Sharad Pawar was our god yesterday and we still believe in him today,” Ajit Pawar has said.

Maharashtra Marathi News Politics Pune

Join WhatsApp

Join Now