Rohini Khadse । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महाराष्ट्रात मराठी भाषेची सक्ती व्हावी आणि व्यवहारात ही भाषा वापरली जावी अशी मागणी केली जात आहे. नुकतेच मनसेने बँकात मराठी भाषेचा वापर करावा, ही मागणी करत आंदोलनं केली होती. अशातच उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे.
Rohini Khadse Tweet In suuport Of Raj Thackeray
सुनील शुक्ला यांनी ‘मनसे या पक्षाची मान्यता रद्द करावी’, अशी मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेनंतर आता मनसेने (MNS) आक्रमक पवित्रा घेतला आहे. अशातच राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी भाजपावर अप्रत्यक्षपणे टीका करत एक ट्विट केलं आहे.
या पोस्टसोबत त्यांनी राज ठाकरे यांचा फोटो पोस्ट केला आहे. “कालपासून मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली जात आहे. पक्षाला विविध इशारा दिले जात आहेत. त्यांच्या पदाधिकाऱ्यांना टार्गेट केले जात आहे. बंधू राज साहेब, मराठी पक्षांचे, मराठी उद्योजकांचे, मराठी भाषेचे किंबहुना महाराष्ट्र आणि मराठी माणसांचे काही पक्षांना वावगं आहे. कारण याआधीही मराठी माणसांनी बनवलेले दोन मराठी पक्ष फोडण्यात आले आहेत,” असे रोहिणी खडसे यांनी म्हटलंय. तसेच, तुम्ही एकदा तपासून घ्यावे मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे कदाचित ‘महाशक्ती’ तर नाही?, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे.
महत्वाच्या बातम्या :