जान्हवी कपूरचा साडीतला ‘तो’ लूक व्हायरल, दिसते जणू अप्सरा; चाहत्यांच्या नजरा का खिळल्या?

‘पेड्डी’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या जान्हवी कपूरने पांढऱ्या साडीतील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. तिचा हा राजेशाही लूक इंटरनेटवर तुफान व्हायरल झालाय.

Published On: 

Janhvi Kapoor Saree Look actress in white saree posing for photo

एखादी अभिनेत्री साडीत इतकी सुंदर दिसू शकते की तिच्यावरून नजरच हटणार नाही, यावर तुमचा विश्वास बसेल? बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहिल्यावर ही परी आहे की साक्षात अप्सरा? असाच प्रश्न चाहत्यांना पडलाय.

गेल्या काही दिवसांपासून जान्हवी तिच्या आगामी सिनेमामुळे इंटरनेटवर सतत चर्चेत आहे. राम चरणसोबत ती ‘पेड्डी’ या स्पोर्ट्स ॲक्शन चित्रपटात झळकणार आहे. येत्या ३ जून रोजी हा सिनेमा चित्रपटगृहात धडकणार असून, सध्या ती याच सिनेमाच्या प्रमोशनमध्ये खूपच व्यस्त आहे.

Janhvi Kapoor Saree Look

जेव्हा फॅशन आणि साडीतील ग्लॅमरचा विषय निघतो, तेव्हा जान्हवीचं नाव हमखास घेतलं जातं. या नव्या फोटोंमध्ये तिने पांढऱ्या रंगाची अत्यंत सुंदर साडी नेसली आहे. साडीवरचं बारीक नक्षीकाम आणि लेसमुळे तिला एक वेगळाच राजेशाही लूक मिळालाय.

दुसरीकडे या साडीसोबत तिने जो स्टायलिश डिझायनर ब्लाऊज घातलाय, त्यामुळे तिच्या वेशभूषेला एक भन्नाट मॉडर्न टच आलाय. जान्हवीने यावर हेवी मेकअप न करता अत्यंत मिनिमल लूक ठेवला आहे. साडी ड्रेपिंगची तिची ही वेगळी स्टाईल अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

दागिन्यांच्या बाबतीतही तिने खूप साधेपणा जपलाय. कानात फक्त सुंदर झुमके आणि हातात एक ब्रेसलेट घालून ती चाहत्यांना घायाळ करत आहे. मोकळे सोडलेले केस तिच्या सौंदर्यात आणखीच भर घालत आहेत. सध्या तिचा हा मिरर सेल्फी इंटरनेटवर धुमाकूळ घालत असून तिच्या या लूकची जोरदार चर्चा रंगली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही