Share

जयंत पाटलांनी फडणवीसांना सांगितला मास्टरप्लॅन… एका झटक्यात पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त?

इंधन दरवाढीने त्रस्त जनतेला दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारकडे पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट आणि सरचार्ज रद्द करण्याची थेट मागणी केली आहे.

Published On: 

Jayant Patil on Petrol Diesel letter to Devendra Fadnavis

विचार करा, जर उद्यापासून पेट्रोल आणि डिझेल थेट ७० ते ८० रुपये लिटरने मिळू लागलं तर? ऐकायला स्वप्न वाटत असलं तरी हे प्रत्यक्षात शक्य असल्याचा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे.

सध्या महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं असून इंधनाचे भडकलेले दर सर्वांचीच डोकेदुखी ठरत आहेत. त्यामुळेच जयंत पाटलांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक पत्र लिहिलं असून, राज्य सरकारच्या एका निर्णयामुळे इंधनाचे दर लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतात, असा दावा त्यांनी केलाय.

Jayant Patil on Petrol Diesel 

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांवरून सध्या राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. आखाती देशांमधील युद्धामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण आलाय, शिवाय खाद्यतेल आणि भाजीपाल्याचे दरही गगनाला भिडले आहेत. यातच मागील १० दिवसांत सलग चौथ्यांदा इंधन दरवाढ करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

सध्या पेट्रोल २ रुपये ६१ पैशांनी तर डिझेल २ रुपये ७१ पैशांनी वाढलंय. आजघडीला मुंबईत पेट्रोल १११.१२ रुपये तर डिझेल ९६.८६ रुपये प्रति लिटरवर जाऊन पोहोचलं आहे. या दरवाढीविरोधात जयंत पाटलांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला असून, तातडीने सर्वसामान्यांना दिलासा देण्याची मागणी केलीय.

यावर तोडगा काढताना जयंत पाटील म्हणतात की, राज्य सरकार सध्या पेट्रोलवर अंदाजे २५ टक्के व्हॅट आणि १०.१२ रुपये सरचार्ज लावतं. दुसरीकडे, डिझेलवर २४ टक्के व्हॅट आणि ३ रुपये सरचार्ज आकारला जातो. हाच व्हॅट आणि सरचार्ज जर राज्य शासनाने तातडीने रद्द केला, तर मोठा बदल घडू शकतो.

करांचा हा बोजा हटवल्यास आज १११ रुपयांना मिळणारे पेट्रोल थेट ७०-८० रुपयांपर्यंत खाली येऊ शकतं. कठीण आर्थिक परिस्थितीत सरकारने सकारात्मक विचार केल्यास केवळ वाहनचालकांनाच नाही, तर शेती, वाहतूक आणि उद्योग क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास जयंत पाटलांनी पत्रातून व्यक्त केला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install