Share

दीपाली सय्यद यांना थेट धमक्या, सुशांत शेलार संतापले… चित्रपटावरून का उडाली खळबळ?

अशोक खरात प्रकरणावरील चित्रपटात रुपाली चाकणकरांची भूमिका साकारण्यावरून दीपाली सय्यद यांना धमक्या येत आहेत. यावर सुशांत शेलार यांनी त्यांना भक्कम पाठिंबा देत संताप व्यक्त केला आहे.

Published On: 

Dipali Sayyad Movie actress and Sushant Shelar speaking to media

भोंदू बाबाचे काळे धंदे, त्यावर येणारा एक वादग्रस्त सिनेमा आणि आता थेट अभिनेत्रीलाच येणाऱ्या धमक्या… एका चित्रपटामुळे महाराष्ट्राचं राजकारण इतकं का तापलंय? नाशिकमधील प्रसिद्ध भोंदू अशोक खरात याच्या लैंगिक अत्याचार प्रकरणावर आधारित एका सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे.

पण याच सिनेमावरून आता अभिनेत्री दीपाली सय्यद (Dipali Sayyad) यांना थेट धमक्यांचे फोन येऊ लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. दिग्दर्शक स्वरूप सावंत हे खरात प्रकरणावर ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ नावाचा सिनेमा घेऊन येत आहेत.

Dipali Sayyad Movie 

या चित्रपटात दीपाली सय्यद एका महिला नेत्याची, विशेषतः रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. याच भूमिकेवरून त्यांच्यावर आता राजकीय दबाव टाकला जात असून, सिनेमात काम केल्यास राजकीय करिअर उद्ध्वस्त करू, अशा धमक्या काही महिला नेत्यांकडून येत असल्याचा मोठा गौप्यस्फोट खुद्द दीपाली यांनीच केला आहे.

या संपूर्ण प्रकारानंतर शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार (Sushant Shelar) दीपाली सय्यद यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहेत. “कोणत्याही कलाकाराला अशी धमकी देणं अत्यंत चुकीचं आहे. विरोधकांनी २० पैसे पर कमेंट देणारी लोकं बसवून ठेवली आहेत,” असा थेट आरोप करत शेलार यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. दीपाली ताई अशा धमक्यांना भीक घालणार नाहीत आणि त्यांना हवी ती भूमिका साकारण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

दुसरीकडे, दीपाली सय्यद यांनीही या प्रेशरला न घाबरण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेणार असून, हे फोन नेमके कोणाचे होते, याचा थेट पर्दाफाश करणार आहेत.

“मी कलाकार आहे, कोणाचीही परवानगी घेऊन काम करत नाही,” असं सडेतोड उत्तर त्यांनी दिलं आहे. येत्या २ ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून पुढच्या महिन्यात शूटिंग सुरू होणार आहे.

अशोक खरात नेमका कसा भोंदूगिरी करायचा, भक्तांना प्यायला काय द्यायचा आणि लोकांच्या अंधश्रद्धेचा कसा गैरफायदा घ्यायचा, हे यातून समोर येईल. आपण नक्की कोणती भूमिका साकारणार, हे दीपाली यांनी सध्या गुपित ठेवलं असलं तरी, या सिनेमामुळे अनेक बड्या धेंडांचे मुखवटे गळून पडणार असल्याची दाट शक्यता आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install