अमेरिकेने इराणवर केलेले हल्ले ठरले निमित्त, सोन्या-चांदीच्या किमतीत अचानक झाली मोठी घसरण!

अमेरिका आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर डॉलर मजबूत झाल्याने देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

Published On: 

Gold Rate Declines as prices drop in Mumbai and Pune jewelry markets

तुम्हीही येत्या लग्नसराईसाठी सोने खरेदी करण्याचा विचार करत आहात का? जर हो, तर तुमच्यासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. जागतिक बाजारातील घडामोडींमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीच्या (Gold Rate Declines) दरात मोठी घसरण पाहायला मिळत असून ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सध्या अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध पेटल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर कमालीची खळबळ उडाली आहे. अमेरिकेने इराणवर हल्ले सुरूच ठेवल्यामुळे जागतिक बाजारात डॉलर मजबूत झाला असून, गुंतवणूकदारांनी सोन्याऐवजी डॉलरमध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य दिलं आहे.

Gold Rate Declines

आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या हाजिर सोन्याचा दर ४४६१.०२ डॉलर प्रति औंसवर स्थिरावला आहे. या आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे भारतात सोन्याचे भाव गडगडले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, मुंबई, पुणे आणि बंगळुरूमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा १५८,२८० रुपयांवर आला आहे, तर २२ कॅरेटसाठी १४५,०९० रुपये मोजावे लागत आहेत.

दुसरीकडे, देशाची राजधानी नवी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव १५८,४३० रुपये आणि चेन्नईत सर्वाधिक म्हणजे १५९,८१० रुपये प्रति तोळा नोंदवला गेला आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली असून ती आज २८४,९०० रुपये प्रति किलोवर आली आहे.

विशेष म्हणजे, याच वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीत चांदीने चक्क ४ लाखांचा टप्पा पार केला होता, त्या तुलनेत ही घसरण खूप मोठी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी सध्या ७४.९६ डॉलर प्रति औंसवर व्यापार करत आहे.

हवामान आणि जागतिक युद्धाचे सावट पाहता क्रूड ऑईलचे दर वाढण्याची भीती असून यामुळे महागाई वाढू शकते, अशी चिंता जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यातच अमेरिकन फेडरल रिझर्व्ह पतधोरणात कोणताही बदल न करण्याच्या तयारीत असल्याने सोन्यासाठी हा नकारात्मक संकेत मानला जातोय. त्यामुळेच दरात ही घसरण सुरू असून, सर्वसामान्यांसाठी मात्र ही खरेदीची चांगली संधी मानली जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही