वैभव सूर्यवंशीच्या वादळी खेळीने सचिन तेंडुलकरही थक्क, १५ वर्षांच्या पोराने मोडता मोडता सोडला ख्रिस गेलचा विक्रम!

१५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने २९ चेंडूंत ९७ धावांची वादळी खेळी करत सचिन तेंडुलकरलाही थक्क केले. राजस्थान रॉयल्सने हैदराबादचा ४७ धावांनी धुव्वा उडवला.

Published On: 

Sachin Tendulkar praises 15 year old Vaibhav Sooryavanshi for 97 runs in IPL 2026 Eliminator match

अवघ्या १५ वर्षांच्या पोराने आयपीएलसारख्या मोठ्या मंचावर फक्त २९ चेंडूंत ९७ धावा कुटल्या, तर तुम्ही त्याला काय म्हणाल? होय, सध्या क्रिकेट विश्वात अशाच एका नावाची जोरदार चर्चा सुरू असून, त्याच्या या वादळी खेळीने भल्याभल्या गोलंदाजांची झोप उडवली आहे.

आयपीएल २०२६ च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध असा काही धुमाकूळ घातला की थेट ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकरलाही (Sachin Tendulkar) त्याची दखल घ्यावी लागली. वैभवने मैदानात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

Sachin Tendulkar Praises Vaibhav Sooryavanshi 

हैदराबादविरुद्धच्या या ‘करो या मरो’च्या सामन्यात सलामीला आलेल्या वैभवने सुरुवातीपासूनच हल्लाबोल सुरू केला. त्याने अवघ्या २९ चेंडूंत ५ चौकार आणि तब्बल १२ गगनचुंबी षटकार ठोकत ९७ धावांची खेळी केली.

एका क्षणी तो ख्रिस गेलचा सर्वात जलद शतकाचा रेकॉर्ड मोडेल असं वाटत होतं, पण प्रफुल हिंगेच्या चेंडूवर तो बाद झाला आणि त्याचं ऐतिहासिक शतक फक्त ३ धावांनी हुकलं. त्याच्या या धडाकेबाज फलंदाजीने प्रभावित होऊन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ‘एक्स’वर मोठी पोस्ट लिहीत त्याचं तंत्र उलगडलं.

“वैभवचा बॅट स्विंग खरोखरच कमालीचा आहे. लेग साईडला येणाऱ्या चेंडूंवर तो फ्रंट फुटला जाऊन ज्या प्रकारे स्वतःसाठी जागा बनवतो, ते पाहण्यासारखं असतं,” अशा शब्दांत सचिनने त्याचं तोंडभरून कौतुक केलं. आगामी टी-२० वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धांसाठी भारतीय संघाला अशाच निडर खेळाडूंची गरज असते, त्यामुळे भविष्यात तो टीम इंडियाची दारंही ठोठावू शकतो.

या स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच वैभवने आपला दबदबा निर्माण केला आहे. १५ सामन्यांत त्याने ६८० धावा केल्या असून मानाची ‘ऑरेंज कॅप’ सध्या त्याच्याच डोक्यावर आहे.

दरम्यान, वैभव आणि ध्रुव जुरेलच्या जोरावर राजस्थानने २४३ धावांचा डोंगर उभारला आणि हैदराबादला १९६ धावांवर रोखत ४७ धावांनी विजय मिळवला. या विजयासह राजस्थानने थेट ‘क्वालिफायर-२’ मध्ये धडक मारली असून, आता त्यांचा सामना शुक्रवारी गुजरात टायटन्सशी होणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही