🕒 1 min read
एखाद्या मोठ्या सुपरस्टारला अचानक बॅन करण्याची भाषा सुरू झाली, तर बॉलिवूडमध्ये किती मोठा राडा होऊ शकतो? रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि फरहान अख्तर यांच्यात सध्या असाच काहीसा वाद उफाळून आला असून, यात आता ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतने (Rakhi Sawant) थेट उडी घेतल्याने मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
शूटिंग सुरू व्हायला अवघे तीन आठवडे उरले असताना रणवीरने अचानक फरहान अख्तरच्या आगामी ‘डॉन ३’ चित्रपटातून काढता पाय घेतला. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या फरहानने थेट ‘FWICE’ (फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज) कडे धाव घेत अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल केली.
Rakhi Sawant Defends Ranveer Singh
यावर संस्थेने तातडीने असहकाराचे निर्देश जारी केले. याच वादात आता राखी सावंत रणवीरच्या मदतीला धावून आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत पापाराझींशी संवाद साधताना राखीने थेट फेडरेशन आणि फरहान अख्तरवर जोरदार हल्लाबोल केला.
“ज्या लोकांनी रणवीर सिंहला बॅन करण्याचा निर्णय घेतलाय, त्यांचा मी अत्यंत तीव्र शब्दांत निषेध करते. रणवीर आज एक मोठा सुपरस्टार आहे. रणवीर आणि दीपिकाने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये हे स्थान मिळवलंय, त्यामुळे त्यांच्यावर जळणारे भरपूर लोक आहेत,” असं रोखठोक मत राखीने मांडलं.
या संपूर्ण वादात राखीने अचानक सलमान खानचीही एन्ट्री करून देत सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. “तुमच्यात जर खरंच इतकी ताकद आणि हिंमत असेल, तर भाईजान सलमान खानला बॅन करून दाखवा,” असं खुलं आव्हानच तिने फेडरेशनला दिलं. फक्त सलमान भाईला हात लावून दाखवा, भाई एकट्याने तुम्हा सर्वांची बँड वाजवेल, असा दावाही तिने अत्यंत आक्रमक शैलीत केला.
दुसरीकडे, दिग्दर्शक फरहान अख्तरवर निशाणा साधताना राखीची जीभ चांगलीच घसरली. फरहानचे सिनेमे कधी चाललेच नाहीत, तो फक्त स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आणि पुन्हा लाईमलाईटमध्ये येण्यासाठी रणवीरच्या नावाचा वापर करत असल्याचा मोठा गौप्यस्फोट राखीने केला. त्यामुळे आता हे प्रकरण बॉलिवूडमध्ये आणखी किती तापतंय आणि यावर फरहान काय प्रतिक्रिया देतो, हे पाहणं रंजक ठरणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मान्सूनचा पहिला अंदाज हुकला, आता ‘या’ तारखेला धडकणार? पावसाच्या नव्या अपडेटने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली!
- अभिनेत्री दिपाली सय्यद यांना धमक्यांचे फोन, रुपाली चाकणकरांचा रोल केल्यास करिअर उद्ध्वस्त करण्याचा इशारा!
- थलपती विजय पोहोचले पंतप्रधान मोदींच्या दरबारी, २५ मिनिटांच्या ‘त्या’ गुपित भेटीने उडाली खळबळ!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












