मलायका अरोराचा ट्रोलर्सवर थेट हल्लाबोल…….१९ वर्षांनी लहान तरुणाला डेट करण्यावर अखेर सत्य सांगितलंच!

१९ वर्षांनी लहान असलेल्या उद्योगपतीला डेट करण्यावरून होत असलेल्या ट्रोलिंगवर मलायका अरोराने मौन सोडलं आहे. ‘माझा आनंद हा सार्वजनिक चर्चेचा विषय नाही’, असं सडेतोड उत्तर तिने दिलं.

Published On: 

Malaika Arora News actress smiling gracefully in stylish outfit

एका बाजूला २३ वर्षांचा तरुण मुलगा आणि दुसऱ्या बाजूला स्वतःपेक्षा तब्बल १९ वर्षांनी लहान असलेल्या तरुणासोबत अफेअरच्या जोरदार चर्चा… ऐकून तुम्हालाही थोडा धक्का बसला ना? पण सध्या याच एका गोष्टीमुळे बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) इंटरनेटवर प्रचंड ट्रोल होत आहे. तिच्या खासगी आयुष्यावरून लोक तिला पुन्हा एकदा टार्गेट करत आहेत.

अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायकाने अभिनेता अर्जुन कपूरला डेट करायला सुरुवात केली. अर्जुन तिच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान असल्याने तेव्हाही तिला बरंच ऐकावं लागलं होतं. काही वर्षे सोबत राहिल्यानंतर या दोघांचे रस्ते वेगळे झाले.

Malaika Arora News

पण आता पुन्हा एकदा एका नव्या नावाची चर्चा सुरू झालीये. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मलायका सध्या हिरे व्यापारी हर्ष मेहताला डेट करत आहे, जो तिच्यापेक्षा तब्बल १९ वर्षांनी लहान आहे. यावरूनच इंटरनेटवर खळबळ उडाली असून आता मलायकाने यावर सडेतोड उत्तर दिलं आहे. 

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या नुकत्याच एका मुलाखतीत मलायकाने या वाढत्या ट्रोलिंगवर स्पष्ट शब्दांत भाष्य केलं. ती म्हणाली की, इंटरनेटच्या या जगात खूप गोंधळ असतो, पण तो नेहमीच योग्य असेल असं नाही. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं मी आता सोडून दिलंय.

“स्वतःभोवती मी आता एक भक्कम सीमारेषा आखून घेतली आहे. यामुळे बाहेरच्या गोंगाटाचा माझ्या मनःशांतीवर काहीही परिणाम होत नाही,” असा मोठा गौप्यस्फोट मलायकाने केलाय. इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर लोकांच्या मतांपुढे आपली मनःशांती पणाला लावायची नाही, हे ती आता पक्कं शिकली आहे.

सध्या सोशल मीडियावर कोण काय बोलतंय, हे वाचत बसण्यात तिला अजिबात रस नाही. याउलट, ती आता फक्त तिचं काम, कुटुंब आणि ज्या गोष्टींमधून खऱ्या अर्थाने सकारात्मक ऊर्जा मिळते, त्यावरच अवलंबून आहे.

वयानुसार माणसाचा दृष्टीकोन बदलतो, हेही तिने अत्यंत मोकळेपणाने मान्य केलं. कमी वयाच्या मुलांसोबत असलेल्या रिलेशनशिपवरून सतत होणाऱ्या टीकेवर तिने ट्रोलर्सची चांगलीच शाळा घेतली.

“जे लोक ट्रोल करतात, त्यातून त्यांचीच मानसिकता दिसून येते. माझा आनंद हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे, तो संरक्षित आहे आणि तो सार्वजनिक चर्चेचा विषय नक्कीच नाही,” असं म्हणत तिने टीकाकारांची बोलती कायमची बंद केली.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही