Share

निवडणूक आयुक्त फुकटचा पगार घेतात का? उद्धव ठाकरेंचा संताप; ‘भाईलोग’ म्हणत थेट हल्लाबोल!

निवडणूक याद्यांचा घोळ आणि पुसल्या जाणाऱ्या शाईवरून उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; ‘नऊ वर्ष हे काय करत होते?’ असा विचारला जाब.

Published On: 

Raj Thackeray, Uddhav Thackeray

🕒 1 min read

मुंबई – निवडणुका येतात आणि जातात, पण मतदार याद्यांमधला गोंधळ काही संपता संपत नाही. आज पुन्हा एकदा याचाच प्रत्यय आलाय आणि यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. मतदानासाठी गेल्यानंतर अनेक ठिकाणी मशीन बंद पडणे, नावं गहाळ होणे अशा तक्रारी येत असतानाच आता खुद्द उद्धव ठाकरे यांचा संयम सुटला आहे. निवडणूक आयोगाच्या कारभारावर त्यांनी अत्यंत तिखट शब्दांत ताशेरे ओढले आहेत.

Uddhav Thackeray slams Election Commission 

वांद्रे येथील कलानगर भागात सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावल्यानंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांचा पारा चढलेला होता. ते म्हणाले, “मुंबईची महापालिका निवडणूक नऊ वर्षांनी होतेय, मग मधली नऊ वर्ष जे निवडणूक आयुक्त असतील, त्यांचे कर्मचारी असतील ते नक्की काय करत होते? निवडणूक आयुक्त कसला पगार घेतात? याचा आता खुलासा झाला पाहिजे.” आयोगाचा हा भोंगळ कारभार बघून हे ‘दादागिरी करणारे भाईलोग’ नक्की काम काय करतात, असा थेट सवालच त्यांनी उपस्थित केला आहे.

विशेष म्हणजे, सकाळपासून अनेक ठिकाणाहून तक्रारी येत आहेत की, मतदानानंतर बोटाला लावलेली शाही सहज पुसली जात आहे. यावरही उद्धव ठाकरेंनी Election Commission ला धारेवर धरलं. “हा याद्यांचा आणि शाईचा घोळ ताबडतोब थांबला पाहिजे, नाहीतर आता आयुक्तांवरच कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. त्यामुळे आता आयोगाला रोजच्या कामाचा हिशोब द्यावा लागेल, असं चित्र निर्माण झालंय.

दुसरीकडे, राज ठाकरे यांनीही आयोगाच्या हेतूवर शंका उपस्थित केली आहे. “मतदान करा, शाही पुसा आणि पुन्हा मतदान करा, हाच तुमचा विकास आहे का?” असा खोचक टोला त्यांनी लगावला. नवीन मार्कर पेन आणि ‘पाडू’ नावाच्या यंत्रावरही त्यांनी जोरदार आक्षेप नोंदवला आहे. दोन्ही ठाकरे बंधूंनी एकाच वेळी आयोगाला लक्ष केल्याने प्रशासन आता काय भूमिका घेतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही