Share

अजितदादांनी भाजपची ‘ती’ फाईल उघडताच चंद्रकांतदादांचा तीळपापड; थेट फडणवीसांचं नाव घेत दिला इशारा!

अजित पवारांनी ‘पार्टी फंडा’चा आरोप करत भाजपवर बॉम्ब टाकला आहे. यावर चंद्रकांत पाटलांनी थेट ‘आम्हाला विचार करावा लागेल’ असा इशारा दिल्याने महायुतीत खळबळ उडाली आहे.

Published On: 

BJP Minister Chandrakant Patil warns Ajit Pawar | Pune Exit Poll

पुणे – राजकारणात मित्र कोण आणि शत्रू कोण, हे परिस्थितीनुसार बदलत असतं, याचा प्रत्यय पुन्हा एकदा महाराष्ट्राला आलाय. ज्या सिंचन घोटाळ्यावरून (Irrigation Scam) भाजपने अनेक वर्षे रान उठवलं होतं, आता खुद्द अजित पवारांनीच (Ajit Pawar) त्याच मुद्द्यावरून भाजपच्या जुन्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत. अजितदादांनी पुण्यात भरसभेत ‘ती’ जुनी फाईल माझ्याकडे असल्याचं सांगताच इकडे चंद्रकांत पाटील यांचा अक्षरशः तीळपापड झालाय.

नेमकं प्रकरण काय?

पुण्यात प्रचारादरम्यान अजित पवार यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. त्यांच्या दाव्यानुसार, 1999 मध्ये सत्तेत आलेल्या युती सरकारच्या काळात पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या किंमतीत मोठी अफरातफर झाली होती. “जेव्हा मी मंत्री झालो, तेव्हा 310 कोटींच्या या प्रकल्पाची फाईल माझ्याकडे आली. चौकशी केल्यावर अधिकाऱ्यांनी कबूल केलं की मूळ किंमत फक्त 200 कोटी होती, पण ‘पार्टी फंडासाठी 100 कोटी आणि स्वतःसाठी 10 कोटी’ अशी वाढीव रक्कम त्यात घुसडली गेली,” असा सनसनाटी आरोप अजित पवारांनी केला आहे. “ती फाईल अजूनही माझ्याकडे आहे, ती बाहेर काढली असती तर हाहाकार उडाला असता,” असंही ते म्हणाले.

Ajit Pawar Alleges 100 Crore Corruption in BJP Era 

अजितदादांच्या या ‘हल्लाबोल’ वक्तव्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री Chandrakant Patil यांनी यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. पाटील स्पष्ट शब्दांत म्हणाले की, “अजित पवार ज्या पद्धतीने बोलतायत, आरोप करतायत, त्याबाबत परवाच्या कॅबिनेटमध्ये मी देवेंद्रजींशी (Devendra Fadnavis) चर्चा करणार आहे. हे दोघे (शरद पवार आणि अजित पवार) पुन्हा एकत्र येणार का? आणि आम्हाला पुन्हा यांना मांडीला मांडी लावून बसावं लागणार का? याचा विचार करावा लागेल.”

दुसरीकडे, तत्कालीन अर्थमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही या वादात उडी घेतली आहे. “जर माहिती इतकी गंभीर होती, तर अजितदादांनी ती 25 वर्षे का लपवून ठेवली?” असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे महायुतीत आता ‘ऑल इज वेल’ नाही, हेच यावरून दिसून येतंय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही