Share

‘महाराष्ट्राची पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही’; CM फडणवीसांची मोठी घोषणा

CM Devendra Fadnavis यांनी पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही, असा संकल्प व्यक्त करत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे लक्ष्य सांगितले.

Published On: 

CM Devendra Fadnavis Independence Day speech

मुंबई : महाराष्ट्रातील मागील आणि सध्याच्या पिढ्यांनी मोठ्या प्रमाणात दुष्काळ बघितला, पण महाराष्ट्राची (Maharashtra) येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही. मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्रातील काही तालुके असतील या ठिकाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये पाणी आणून महाराष्ट्राला कायम दुष्काळमुक्त करण्याचा आपला प्रयत्न आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केले.

स्वातंत्र्यदिनी राज्याला संबोधित करताना फडणवीस यांनी नमूद केले की, महाराष्ट्र देशाची ‘स्टार्टअप कॅपिटल’ झाले आहे. त्यामुळे रोजगाराच्या सर्वाधिक संधी देखील महाराष्ट्रामध्ये निर्माण करून युवाशक्तीला न्याय देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, असे फडणवीसांनी सांगितले.

महाराष्ट्र देशाचे ‘ग्रोथ इंजिन’

विकसित भारताच्या संकल्पनेत महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी महाराष्ट्र सज्ज आहे. महाराष्ट्र हे आपल्या देशाचं ‘ग्रोथ इंजिन’ (Growth Engine) आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान यांनुसार राज्याची निरंतर प्रगती होत आहे. महिलांना ‘शेतकरी’ म्हणून अधिकृत दर्जा देणारा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले, याचा फडणवीस यांनी अभिमान व्यक्त केला.

CM Devendra Fadnavis Independence Day speech

“सध्या महाराष्ट्र ही देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत राज्याचा आर्थिक विकास दर सुमारे ८.८ टक्के नोंदवला गेला. प्रत्येक जिल्ह्याला विकासाचे इंजिन बनवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असत्याची त्यांनी सांगितले.

यापैकी सुमारे १३ जिल्ह्यांनी आपली उद्दिष्टे पूर्ण केली आहेत आणि इतर जिल्हे देखील विकासाच्या दिशेने अशीच प्रगती करत आहेत. विकास केवळ काही निवडक क्षेत्रांपुरता मर्यादित न राहता तो रांगेतील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावा. मग तो गडचिरोली, पालघर किंवा नंदुरबार यांसारखा कोणताही भाग असो, हेच आमचे ध्येय आहे.

शेतकऱ्यांचे कल्याण

फडणवीस यांनी सांगितले की, “सरकारने शेतकऱ्यांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’ सुरू केली. आम्ही ३६,००० कोटी रुपयांची कर्जमाफी योजना राबवत आहोत, ज्याचा लाभ ५६ लाख शेतकऱ्यांना होत आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवण्याचे आम्ही नियोजन केले होते, सध्या ७६ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळते आणि आगामी वर्षात १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल, याची खात्री करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही