मुंबई: राज्यभरात अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने गणपती विसर्जन मिरवणुकांचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे जाऊन विसर्जन व्यवस्थेची पाहणी केली. यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी गणेशभक्तांच्या उत्साहाचे आणि पोलिसांच्या नियोजनाचे कौतुक केले.
“दहा दिवस अतिशय भक्तिभावाने पूजलेल्या बाप्पाच्या विसर्जनाचा आज दिवस आहे. महाराष्ट्रभरात आणि विशेषतः मुंबईत भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई आणि पुण्यात विसर्जन मिरवणुका जास्त वेळ चालतात, त्यामुळे पोलीस आणि महापालिकेने अतिशय चांगली व्यवस्था केली आहे,” असे फडणवीस म्हणाले. तसेच भक्तांनी सुरक्षितता आणि सावधगिरी बाळगून मिरवणुकांमध्ये सहभागी व्हावे, अशी विनंती त्यांनी केली.
मुंबई पोलिसांच्या कामगिरीचे विशेष कौतुक करताना ते म्हणाले की, मुंबई पोलीस हे देशातील आणि जगातील अतिशय प्रोफेशनल दलांपैकी एक आहेत. कोणताही मोठा इव्हेंट असला तरी ते लोकांना कमीत कमी त्रास होईल अशा पद्धतीने उत्तम नियोजन करतात. मुंबई महापालिकेनेही यंदा उत्तम व्यवस्था केल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, गणपती ही बुद्धीची देवता असल्याने विरोधकांबाबत बाप्पाकडे काय मागितले, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर उत्तर देताना त्यांनी विरोधकांना टोला लगावला. “सुबुद्धी यावी आणि कुबुद्धीचं विसर्जन व्हावं, अशी माझी बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे,” असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
📌 महत्वाच्या बातम्या
- मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात संताप; जंतरमंतरवर आंदोलकांवर कारवाई, योगेंद्र यादवांसह ४० जणांना अटक
- बँकांना ५ दिवसांचा आठवडा देण्यास सरकारचा नकार; बँक कर्मचाऱ्यांची २८ ते ३० सप्टेंबरला संपाची हाक
- ज्ञानेश कुमारांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; ‘ECINet’ आणि मतदार यादीच्या घोळावर आक्षेप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now📈 लोकप्रिय बातम्या
Quick Answers
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे जाऊन विसर्जन व्यवस्थेची पाहणी केली.
विरोधकांना सुबुद्धी मिळो आणि त्यांची कुबुद्धी नष्ट व्हावी किंवा तिचे विसर्जन व्हावे, अशी प्रार्थना त्यांनी बाप्पाकडे केली आहे.
मुंबई पोलीस हे जगातील आणि देशातील अत्यंत प्रोफेशनल दलांपैकी एक असून, ते कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन करतात असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
तुमच्या प्रश्नाचे उत्तर आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास Web Search fallback वापरला जाऊ शकतो.












