Yogendra Yadav: निवडणूक आयोग आणि एसआयआर (SIR) बाबत झालेल्या खुलाशानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात देशभरात संतापाचे वातावरण आहे. काँग्रेसच्या देशव्यापी आंदोलनानंतर आज AISA जंतरमंतरवर ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोलन केले.
या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी अनेकांना फरफटत नेत ताब्यात घेतले. पोलिसांनी राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव आणि नेहा बोरा यांच्यासह ४० हून अधिक आंदोलकांना अटक केली असून जंतरमंतरचा परिसर बंद केला आहे.
प्रशांत भूषण, अंजली भारद्वाज आणि विद्यार्थी आंदोलनासाठी जंतरमंतरवर पोहोचले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना १५० मीटर अंतरावरच बॅरिकेड्स लावून रोखले. पोलिसांनी सर्व आंदोलकांना अटक करून संपूर्ण रस्ता रिकामा केला आणि त्यांना आंदोलनाच्या ठिकाणी जाऊ दिले नाही.
यापूर्वी शुक्रवारीही ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनने जंतरमंतरवर जाहीर सभा घेतली होती. ‘द इंडियन एक्सप्रेस’च्या अलीकडील वृत्तामुळे निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे सांगत त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या अटकेची मागणी केली. या सभेत आयसाच्या अध्यक्षा नेहा, योगेंद्र यादव, आरजेडी खासदार मनोज झा, सीपीआयएमएल लिबरेशनचे दीपांकर भट्टाचार्य, प्रशांत भूषण, अंजली भारद्वाज आणि नंदिता नारायण सहभागी झाले होते.
दुसरीकडे, आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसने देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. डेहराडूनमध्ये कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला, तर पाटण्यात पोलिसांनी आंदोलकांवर पाण्याचे फवारे मारले. तसेच, कॉकरोच जनता पक्षाने (CJP) ज्ञानेश कुमार यांना राजीनाम्यासाठी ४८ तासांची मुदत दिली असून, राजीनामा न दिल्यास २ ऑक्टोबरपासून देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- बँकांना ५ दिवसांचा आठवडा देण्यास सरकारचा नकार; बँक कर्मचाऱ्यांची २८ ते ३० सप्टेंबरला संपाची हाक
- ज्ञानेश कुमारांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; ‘ECINet’ आणि मतदार यादीच्या घोळावर आक्षेप
- सिल्व्हर ओकवर शरद पवारांची महत्त्वाची बैठक; पार्थ, जय आणि युगेंद्र पवारही उपस्थित
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now📈 लोकप्रिय बातम्या
Quick Answers
जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव आणि नेहा बोरा यांच्यासह ४० हून अधिक आंदोलकांना अटक केली आहे.
कॉकरोच जनता पक्षाने (CJP) ज्ञानेश कुमार यांना राजीनाम्यासाठी ४८ तासांची मुदत दिली आहे. राजीनामा न दिल्यास २ ऑक्टोबरपासून देशव्यापी आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.
निवडणूक आयोग आणि एसआयआर (SIR) बाबत झालेल्या खुलाशामुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात संतापाचे वातावरण आहे, ज्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलने होत आहेत.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
तुमच्या प्रश्नाचे उत्तर आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास Web Search fallback वापरला जाऊ शकतो.












