मुंबई – सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत ‘सिल्व्हर ओक’वर एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पार्थ पवार आणि जय पवार हेदेखील उपस्थित होते.
सध्या या कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गटाचे पॅनेल, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील अजित पवार गटाचे पॅनेल आमनेसामने आहे. दुसरीकडे, भाजप आणि शिवसेना शिंदे गटानेही ही निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. मात्र, निवडणूक बिनविरोध व्हावी अशी शरद पवारांची भूमिका असल्याने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, दुष्काळाच्या मुद्द्यावरून शरद पवार आक्रमक झाले असून ते लवकरच दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. तत्पूर्वी, उद्या पंढरपूरमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा मोर्चा काढण्यात येणार आहे. ‘सरकारला शेतकऱ्यांना मदत करण्याची सद्बुद्धी मिळू दे’, असे साकडे यावेळी विठ्ठलाला घातले जाणार आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी गुरुवारी एक बैठक पार पडली. या आंदोलनामुळे आगामी काळात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- निवडणूक आयोगावरील आरोपांत NDA च्या मंत्र्याची उडी; ज्ञानेश कुमारांनी भूमिका स्पष्ट करावी
- अमित शाहांना विषबाधा; ‘असं काय खाल्लं? देशात विष पसरवून कुठे गेले?’, राऊतांचा हल्लाबोल
- मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांवर महाभियोग आणणार; संजय राऊतांचा थेट इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











