Share

निवडणूक आयोगावरील आरोपांत NDA च्या मंत्र्याची उडी; ज्ञानेश कुमारांनी भूमिका स्पष्ट करावी

निवडणूक प्रक्रियेवरील आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी जनतेचा संभ्रम दूर करण्यासाठी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी केली आहे.

Published On: 

Union Minister Chirag Paswan speaking to the media about the Election Commission.

पटना: निवडणूक आयोगावर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित होत असताना एनडीएतील मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी आयोगाने याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी भूमिका मांडली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आपली भूमिका स्पष्टपणे जनतेसमोर मांडावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगामध्ये भाजपाचा हस्तक्षेप असल्याचा आरोप करत काल ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तसेच, कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दीपके यांनीही याप्रकरणी मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे. या राजकीय घडामोडींवर चिराग पासवान यांनी प्रतिक्रिया दिली.

पटना येथे पत्रकारांशी संवाद साधताना चिराग पासवान म्हणाले, “निवडणूक प्रक्रियेसंबंधी काही प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांचे म्हणणे नेमकं काय आहे ते स्पष्ट करावे, खासकरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांनी यावर त्यांचं मत भक्कमपणे सर्वांसमोर मांडलं पाहिजे. त्यामुळे जनतेच्या मनातही काहीही संभ्रम तयार होणार नाहीत.”

निवडणूक आयोग ही स्वतंत्र आणि स्वायत्त संस्था असताना त्यावर आक्षेप घेतले जात असतील, तर त्यावर स्पष्टीकरण देण्याची जबाबदारीही आयोगाचीच असल्याचे चिराग यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “विरोधी पक्षाला काय वाटतं यापेक्षा सर्वात महत्त्वाचं आहे ते सामान्य जनतेला या सगळ्याबद्दल काय वाटतं? या सगळ्या गदारोळामुळे जनतेच्या मनामध्ये निवडणूक आयोगावर कोणत्याही प्रकारचा संभ्रम आणि अविश्वास निर्माण नको व्हायला.”

विरोधी पक्षाकडे राजकारणासाठी मुद्दे असतात आणि त्यामुळे ते आरोप करत असल्याचेही चिराग यांनी म्हटले. मात्र, निवडणूक आयोगाने विरोधी पक्षाला उत्तर देण्यासाठी नव्हे, तर सामान्य जनतेला उत्तर देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले. देशाच्या लोकशाहीची सुंदरता टिकून राहण्यासाठी निवडणूक प्रक्रियेवर नागरिकांचा विश्वास कायम राहणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही