Share

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांमुळेच शिंदे-पवार निवडणूक जिंकले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

ज्ञानेश कुमारांमुळेच शिंदे आणि अजित पवार गट निवडणूक जिंकले असून महाराष्ट्रातील निवडणूक रद्द करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

Published On: 

Sanjay Raut addressing media regarding Election Commissioner Dnyanesh Kumar

मुंबई– मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यामुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार विधानसभेची निवडणूक जिंकले असून महाराष्ट्रातील निवडणूक रद्द करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनीही काल हीच मागणी केल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा खळबळजनक दावा केला.

भाजप आणि शिंदे गटाने ज्ञानेश कुमार यांच्या माध्यमातून मते आणि निवडणूक चोरल्याचा आरोप राऊत यांनी केला. “ज्ञानेश कुमार यांच्यासारखी माणसे देशाचे एक नंबरचे शत्रू आहेत. त्यांनी लोकशाहीचा कत्तलखाना केला असून त्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे,” अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली.

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना राऊत म्हणाले, “आधीचा भारत न झुकणारा होता, पण आता तसे नाही. संसदेवर लाखो लोक धडकल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. मग ज्ञानेश कुमार (Dnyanesh Kumar) राजीनामा का देणार नाहीत?”

तेलंगणाचे निवडणूक आयुक्त राजेश कुमार यांच्यावर एफआयआर दाखल झाल्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी अमित शाह यांनी संसदेत घाईघाईने विधेयक आणल्याचा आरोप राऊत यांनी केला. या विधेयकाला विरोध करणाऱ्या ११० खासदारांना निलंबित करण्यात आले होते. निवडणूक आयुक्तांना अटक करता येणार नाही अशी तरतूद करून माफियागिरीला संरक्षण दिले गेल्याचे ते म्हणाले. “हे छोट्या शकीलला वाचवण्यासाठी केले, मोठा शकील कोण हे तुम्हीच बघा,” असा टोला त्यांनी लगावला.

“माझ्या वाक्याखाली अंडरलाईन करून ठेवा, अमित शाहांच्या या छोट्या शकीलला जावेच लागेल. भविष्यात त्यांची पापे उघड होतील आणि खटले चालवले जातील,” असा इशारा राऊत यांनी दिला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही