मुख्यमंत्रिपदाच्या १२० दिवसांनंतर प्रकाश राज यांची विजयबाबत मवाळ भूमिका; म्हणाले, “माझ्या मनात शंका, पण…”

विधानसभा निवडणुकीत टीका करणाऱ्या अभिनेते प्रकाश राज यांनी मुख्यमंत्री विजय यांच्याबाबत मवाळ भूमिका घेतली आहे. सरकारच्या कामगिरीचे आत्ताच मूल्यमापन न करता एक वर्ष वेळ देण्याचे त्यांनी म्हटले आहे.

Published On: 

Vijay Thalapathy CM News: राज्यपालांवर प्रकाश राज भडकले! | Prakash Raj

तिरुचिरापल्ली: तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्यावर सडकून टीका करणारे ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी आता मवाळ भूमिका घेतली आहे. विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारला नुकतेच १२० दिवस पूर्ण झाले असून, त्यांच्या कामगिरीचे आत्ताच मूल्यमापन करणे घाईचे ठरेल, असे मत प्रकाश राज यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी विजय यांच्या सरकारला किमान एक वर्षाचा अवधी देण्याचे आवाहन केले आहे.

पत्रकारांशी बोलताना प्रकाश राज म्हणाले, “विजय हे केवळ त्यांना मतदान करणाऱ्यांचेच नव्हे, तर मतदान न करणाऱ्यांचेही मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या सरकारच्या कामगिरीवर लगेच भाष्य करण्याऐवजी किमान एका वर्षाचा वेळ देणे गरजेचे आहे.” राज्यात सध्या सुरू असलेल्या आंदोलनांबाबत ते म्हणाले की, सत्ताधारी कोणताही असो, लोकांनी मागण्या मांडणे हा लोकशाही प्रक्रियेचा भाग आहे.

“माझ्या मनात विजयबद्दल आजही अनेक शंका आहेत आणि निवडणुकीआधी मी त्या उघडपणे मांडल्याही होत्या. परंतु, आता त्यांच्या पक्षाने (टीव्हीके) विजय मिळवून सरकार स्थापन केले आहे. अवघ्या १२० दिवसांतच निष्कर्षाप्रत येता येणार नाही. मी त्यांच्या पहिल्या अर्थसंकल्पाची वाट पाहणार आहे. सत्तेत असणारी व्यक्ती आवडत नाही म्हणून लगेच टीका करणे योग्य नाही, आपण लोकशाही आणि जनतेच्या मताचा आदर केला पाहिजे,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. एका वर्षानंतरही सरकारने अपेक्षेप्रमाणे काम केले नाही, तर आपण नक्कीच प्रश्न उपस्थित करू, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री विजय यांच्या नुकत्याच झालेल्या ब्रिटन दौऱ्यात त्यांची अभिनेता अजित कुमार यांच्याशी ‘मिशेलिन ले मान्स कप’ शर्यतीदरम्यान भेट झाली होती. या भेटीचेही प्रकाश राज यांनी समर्थन केले. या भेटीत काहीही गैर नसून, हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात आणल्याचा विजय यांचा दावा अधिक महत्त्वाचा असल्याचे ते म्हणाले.

निवडणुकीपूर्वी प्रकाश राज यांनी विजय यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ‘चित्रपट आणि राजकारण वेगळे असून तुम्ही तमिळ अस्मितेवर कधी लढा दिला आहे का?’ असा सवाल केला होता. प्रकाश राज आणि विजय यांनी ‘गिली’, ‘पोक्किरी’, ‘सिल्वक्कासी’ आणि ‘वारिसु’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही