Share

मुख्य निवडणूक आयुक्तांवर हुकूमशाहीचा आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवून अटक करण्याची विरोधकांची मागणी

मतदार याद्यांच्या फेरतपासणीत दोन आयुक्तांचे आक्षेप डावलल्याचा ठपका; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीची आणि अटकेची विरोधकांची मागणी.

Published On: 

Election Commission of India headquarters with inset of CEC Gyanesh Kumar.

नवी दिल्ली: भारतीय निवडणूक आयोगात एकाधिकारशाही राबवत असल्याचा आरोप करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांना पदावरून हटवण्याची आणि त्यांना अटक करण्याची मागणी देशभरातील विरोधी पक्षांनी केली आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीच्या (SIR) प्रक्रियेत अन्य दोन निवडणूक आयुक्तांनी नोंदवलेले आक्षेप डावलून मुख्य आयुक्तांनी निर्णय घेतल्याने हा वाद उफाळून आला आहे.

निवडणूक आयुक्त सुखबीरसिंग संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या १० महिन्यांच्या कालावधीत १४ वेळा आक्षेप नोंदवल्याचे समोर आले आहे. नवमतदारांची नोंदणी करणाऱ्या अर्ज क्रमांक सहाचे बदललेले स्वरूप, मतदार यादीतून नावे वगळणे किंवा नोंदवणे आणि मतदार याद्यांचे नवी दिल्लीत होत असलेले ‘केंद्रीकरण’ या गंभीर मुद्द्यांवर या दोन आयुक्तांनी प्रतिकूल मत नोंदवले होते. आपला विरोध डावलून मुख्य आयुक्तांनी परस्पर निर्णय घेतल्याची तक्रार या दोन्ही आयुक्तांनी कॅबिनेट सचिवांकडे केली होती.

आयोगाचे स्पष्टीकरण आणि मतभेदांची कबुली

या वादानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी एक निवेदन प्रसिद्ध करत स्पष्टीकरण दिले आहे. “अंतर्गत मतभेद आणि भिन्न निरीक्षणे ही कोणत्याही बहुसदस्यीय संस्थेतील नियमित निर्णयप्रक्रियेचा भाग आहेत. आयोगातील काही निवडक बाबी समोर आणल्याने संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही,” असा दावा आयोगाने केला आहे. या निवेदनातून आयोगाने अप्रत्यक्षरीत्या आयुक्तांमधील मतभेदांची लेखी कबुली दिली आहे.

राजकीय प्रतिक्रिया आणि आरोप-प्रत्यारोप

काँग्रेसने ज्ञानेश कुमार यांच्या तातडीच्या राजीनाम्याची मागणी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर महाभियोग चालवून त्यांना पदावरून हटवावे आणि अटक करावी, अशी मागणी केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केले की, राज्यसभेतील विरोधी पक्षाच्या ७३ सदस्यांनी ज्ञानेश कुमार यांना हटवण्यासाठी २४ एप्रिल २०२६ रोजीच नोटीस दिली आहे. संसदेचे अधिवेशन अद्याप संपलेले नसल्याने राज्यसभेच्या अध्यक्षांनी यावर निर्णय घ्यावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला उत्तर द्यावे, अशी अपेक्षा खरगे यांनी व्यक्त केली.

दुसरीकडे, निवडणूक आयुक्तांमधील भिन्न मते पाहता यातून खऱ्या लोकशाहीचे प्रत्यंतर येते, अशी प्रतिक्रिया भाजपने दिली आहे.

नेते आणि तज्ज्ञ काय म्हणाले?

“मतांची चोरी हा देशवासीयांविरोधातील गुन्हा आहे. हा संविधानावर केलेला हल्ला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगातील अधिकारी मोठी चूक करत आहेत.”
– राहुल गांधी, विरोधी पक्षनेते

“मतदारयाद्यांच्या पुनरावलोकनाची प्रक्रिया बेकायदा असेल तर या आधारे निवडणुका घेतल्या जाऊ शकत नाहीत. ‘एसआयआर’मध्ये चुका झाल्या असतील तर पुन्हा जुन्या मतदारयाद्या वापरता येण्याची कायदेशीर शक्यता आहे.”
– एस. वाय. कुरेशी, माजी मुख्य निवडणूक आयुक्त

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही