मुंबई– मराठी मनोरंजनसृष्टीत नवखे कलाकार चित्रपटांच्या प्रमोशनकडे पाठ फिरवत असल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आगामी ‘अफरातफरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी अभिनेता ओंकार भोजनेच्या (Onkar Bhojane) वागणुकीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ओंकार फोन उचलत नसून तो अत्यंत ‘अनप्रोफेशनल’ आणि खोटारडा असल्याची टीका कवडे यांनी केली आहे.
एका मुलाखतीत मिलिंद कवडे म्हणाले, “ओंकारला आम्ही जूनमध्येच सांगितले होते की ऑक्टोबरमध्ये सिनेमा प्रदर्शित होतोय. मात्र, तो माझा, निर्मात्यांचा किंवा ईपीचा (EP) कोणाचाही फोन उचलत नाही. फोन केल्यावर ‘दादा मी तुला कॉलबॅक करतो,’ असा त्याचा टेम्प्लेट मेसेज येतो. गेले चार महिने हेच सुरू आहे.”
ज्येष्ठ कलाकारांच्या व्यावसायिकतेचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, संजय नार्वेकर वेळ पाळून प्रमोशनला येतात, तर मोहन सरांनी हैदराबादहून प्रमोशनसाठी स्वतःचा सेल्फी व्हिडीओ पाठवला. मात्र, ओंकार कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देत नसल्याने शेवटी निर्मात्यांनी कंटाळून त्याला ‘चित्रपट महामंडळात तक्रार करू का?’ असा इशारा देणारे पत्र पाठवले आहे.
“मी आता कानाला खडा लावला असून पुढच्या सिनेमात ओंकारला अजिबात घेणार नाही. एक कलाकार म्हणून तो उत्तम काम करतो, पण माणूस म्हणून तो खूप अनप्रोफेशनल आणि सराईत खोटारडा आहे. दिग्दर्शक-निर्मात्यांचे फोन न उचलणे, सतत खोटे बोलणे याला एखाद्याला लटकवून ठेवणे म्हणतात,” अशा शब्दांत कवडेंनी आपली नाराजी व्यक्त केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘मुख्य निवडणूक आयुक्तांचा मनमानी कारभार; राजीनामा द्या’; राज ठाकरेंची मागणी
- मुख्य निवडणूक आयुक्तांवर हुकूमशाहीचा आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवून अटक करण्याची विरोधकांची मागणी
- मुख्यमंत्री फडणवीसांना दणका; पंतप्रधानांना पत्र लिहिणे भोवले; APTEL कडून MERC आणि महावितरणला समन्स
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











